टोकयो, 6 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) पुरुष कुस्तीच्या 65 किलो वजनी गटामध्ये पदकाचा प्रबळ दावेदार बजरंग पुनियानं (Bajrang Punia) सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. बजरंगची क्वार्टर फायनलमध्ये लढत इराणच्या मूर्तझा चेकाशी होता. मूर्तझानं एशियन आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावले होते. अनुभवी कुस्तीपटू म्हणून त्याची ओळख आहे. मात्र बजरंगनं जिगरबाज खेळ करत मूर्तझाचा पराभव केला. मूर्तझानं पहिल्यांदाच बजरंगचा पाय पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र बजरंगनं मोठ्या कौशल्यानं त्यातून सुटका केली. बजरंगनं सुरुवातीला बचाव करण्यावर भर दिला. पहिल्या राऊंडनंतर इराणच्या कुस्तीपटूकडं एक पॉईंटची निसटती आघाडी होती. दुसऱ्या राऊंडमध्ये दोघांनी आक्रमक खेळ केला. इराणचा कुस्तीपटू आघाडी घेणार असं वाटत असतानाच बजरंगनं खेळ उंचावला. त्याने शेवटच्या काही सेकंदामध्ये बाजी फिरवली. प्रतिस्पर्ध्याला चितपट करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. यापूर्वी भारताच्या रवी कुमार दहियानं सिल्व्हर मेडलची कमाई केली होती. तर दीपक पुनियाचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला. या दोघांनंतर टोकयो ऑलिम्पिकच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारा बजरंग हा तिसरा भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. आता ऑलिम्पिक मेडल जिंकण्यासाठी त्याला आणखी एका विजयाची गरज आहे.
बजरंगची ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा आहे. मात्र त्यानं यापूर्वी कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. बजरंगची पहिली लढत कझाकस्तानच्या अरनाजर अकमातालीवशी होती. या लढतीमध्ये बजरंगनं विजय मिळवला. या विजयासह बजरंगनं क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. टोकयो ऑलिम्पिकमध्ये मेडल नक्की करण्यासाठी त्याला आणखी दोन विजयांची गरज आहे. …म्हणून मुलींसोबत PHOTO काढायला घाबरतो हा फायटर, VIDEO VIRAL
पहिल्या राऊंडमध्ये दोन्ही खेळाडूंनी सावध सुरुवात केली. पहिल्या 30 सेकंदामध्ये कुणालाही पॉईंट मिळाला नाही. त्यानंतर बजरंगनं पहिल्या राऊंडमध्ये 3-1 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या राऊंडमध्ये कझाकस्तानच्या खेळाडूनं 3-3 नं बरोबरी साधली. पण पहिल्या राऊंडमध्ये बजरंगनं अधिक पॉईंट कमावल्यानं त्याला विजयी घोषित करण्यात आले.