JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Tokyo Olympics: बॉक्सर पूजा राणीचा विजयी पंच, मेडल जिंकण्यासाठी एका विजयाची गरज

Tokyo Olympics: बॉक्सर पूजा राणीचा विजयी पंच, मेडल जिंकण्यासाठी एका विजयाची गरज

बॉक्सिंगच्या रिंगमधून भारतासाठी एक चांगली बातमी आहे. भारताच्या पूजा राणीनं 75 किलो वजनी गटाच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

टोकयो, 28 जुलै: बॉक्सिंगच्या रिंगमधून भारतासाठी एक चांगली बातमी आहे. भारताच्या पूजा राणीनं 75 किलो वजनी गटाच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पूजानं अल्जेरियाचा इचरॅक चॅबचा 5-0 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. दोन वेळा आशियाई चॅम्पियन असलेल्या पूजानं या मॅचमध्ये जोरदार खेळ करत इचरॅकला कोणतीही संधी दिली नाही, तिनं सुरुवातीपासूनच आघाडी घेत विजय मिळवला. या विजयासह पूजानं क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. बॉक्सिंगमध्ये ब्रॉन्झ मेडलची मॅच होत नाही. त्यामुळे आता पूजाला मेडल मिळवण्यासाठी फक्त 1 मॅच जिंकणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या

69 किलो वजनी गटामध्ये भारताच्या लवलीनानं क्वार्टर फायमलमध्ये प्रवेश केला आहे. तर अनुभवी बॉक्सर मेरी कोमनंही पहिल्या फेरीत विजय मिळवला आहे. त्यामुळे महिलांच्या बॉक्सिंगमध्ये भारतानं यंदा समाधानकारक कामगिरी केली आहे. मेरी कोमनं डोमिनिक रिपब्लिकच्या मिगुएलिना हर्नांडेज गार्सिया (Hernandez Garcia) हिचा 4-1 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. मेरी कोमनं पहिल्या फेरीमध्येच आघाडी घेतली. त्यानंतर पुढील दोन राऊंडमध्ये तिने ती आघाडी कायम राखत गार्सियाचा पराभव केला. धक्कादायक! शाळकरी मुलींना अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी क्रिकेटपटूला मैदानात अटक सिंधूची आशा कायम टोकयो ऑलिम्पिकमधील भारताची पदकाची प्रबळ दावेदार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) हिची विजयी कामगिरी सुरु आहे. सिंधूनं बुधवारी सकाळी झालेल्या दुसऱ्या लढतीमध्ये हाँगकाँगच्या चीयूंग नगन यीचा 21-9, 21-16 असा सरळ गेममध्ये पराभव केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या