JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Tokyo 2020 Paralympics : कोरोनाच्या सावटामध्ये सुरू होणार पॅरालिम्पिक स्पर्धा, भारतीय खेळाडू इतिहास घडवण्यासाठी सज्ज

Tokyo 2020 Paralympics : कोरोनाच्या सावटामध्ये सुरू होणार पॅरालिम्पिक स्पर्धा, भारतीय खेळाडू इतिहास घडवण्यासाठी सज्ज

टोकयो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics 2020) यशस्वी आयोजनानंतर आजपासून (मंगळवार) पॅरालिम्पिकला (Tokyo Paralympics) सुरुवात होणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

टोकयो, 24 ऑगस्ट: टोकयो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics 2020) यशस्वी आयोजनानंतर आजपासून (मंगळवार) पॅरालिम्पिकला (Tokyo Paralympics) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेवर देखील कोरोना व्हायरसचं सावट आहे. जपानमध्ये सध्या कोरोनाची लाट तीव्र असून त्यामुळे ही स्पर्धा देखील रिकाम्या स्टेडियममध्ये होणार आहे. 5 स्पटेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेवर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे ही स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्ये होणार आहे. भारतीय खेळाडू इतिहास रचण्यासाठी सज्ज  1968 साली भारताने पहिल्यांदा या स्पर्धेत पदार्पण केलं होतं. यावेळी भारताने आतापर्यंतचे सर्वाधिक पॅरालम्पियन स्पर्धेत पाठवले आहेत. बॅडमिंटन आणि तायक्वांडो या स्पर्धांचं पहिल्यांदाच पॅरालिम्पिकमध्ये आयोजन करण्यात येणार आहे. भारताचे 54 खेळाडू 9 प्रकारच्या खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये तिरंदाजी, पॅरा कॅनोईंग, एथलिटिक्स, शूटिंग, टेबल टेनिस, स्विमिंग, बॅडमिंटन, पॉवरलिफ्टिंग आणि तायक्वांडो यांचा समावेश आहे. मागच्या पॅरालिम्पिकमध्ये गोल्ड मेडल पटकावणारा हाय जम्पर मरिय्यप्पन थंगावेलु (Mariyappan Thangavelu) टोकयो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा ध्वज घेऊन प्रतिनिधीत्व करेल. भारताला यंदा टेबिल टेनिस, भालाफेक, पॉवरलिफ्टिंग आणि तायक्वांडो या स्पर्धेत मेडल जिंकण्याची आशा आहे. गुजरातची भविना पटेल आणि सोनलबेन पेटल ही जोडी टेबल टेनिसमध्ये भारतीय टीमचं नेतृत्त्व करतील. भाविना सध्या वर्ल्ड रँकिंगमध्ये 8 व्या तर सोनलबेन 19 व्या क्रमांकावर आहे. या दोघांनी आशियाई स्पर्धेत मेडल जिंकले होते. Tokyo Paralympic 2020: खेळता येणार Google चा सर्वात मोठा Doodle Game कुठे दिसणार पॅरालिम्पिकचे सामने? टोकयो पॅरालिम्पिकचे सामने डीडी स्पोर्ट्सवर सकाळी 9 वाजल्यापासून पाहता येतील. याशिवाय EUROSPORT आणि EUROSPORT HD वर पॅरालिम्पिकच्या सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग होईल. EUROSPORT चॅनल डिस्कव्हरी + ऍपवर स्ट्रीम करता येईल. याशिवाय प्रसारभारतीच्या युट्यूब चॅनलवरही भारताचे सामने लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या