JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / AUS Open 2022: जोकोविचची शेवटची आशा देखील समाप्त, ऑस्ट्रेलियातून हकालपट्टी निश्चित

AUS Open 2022: जोकोविचची शेवटची आशा देखील समाप्त, ऑस्ट्रेलियातून हकालपट्टी निश्चित

9 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा (Australian Open) जिंकणारा टेनिसपटू नोवाक जोकोविचची (Novak Djokovic) या वर्षी ही स्पर्धा खेळण्याची शेवटची आशा देखील संपुष्टात आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 जानेवारी : 9 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा (Australian Open) जिंकणारा टेनिसपटू नोवाक जोकोविचची (Novak Djokovic) या वर्षी ही स्पर्धा खेळण्याची शेवटची आशा देखील संपुष्टात आली आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने यापूर्वी जोकोविचचा व्हिसा रद्द केला होता. सरकारचा हा निर्णय ऑस्ट्रेलियातील फेडरल कोर्टाने योग्य ठरवला आहे. त्यामुळे वर्ल्ड नंबर 1 टेनिसपटूची ऑस्ट्रेलियातील हकालपट्टी अटळ आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा उद्या (सोमवार) सुरू होत आहे. जोकोविचने कोरोना लस (Corona Vaccine) घेतलेली नाही, त्यामुळे तो अन्य नागरिकांसाठी धोका असल्याचे कारण देत ऑस्ट्रेलिया सरकारने त्याचा व्हिसा रद्द केला होता. या निर्णयाला जोकोविचने आव्हान दिले होते. त्यावर फेडरल कोर्टाने एकमताने निर्णय घेत जोकोविचचे अपिल फेटाळून लावले आहे.

संबंधित बातम्या

काय आहे प्रकरण? जोकोविचनं मेडिकल कारण देत व्हिसा नियमांमध्ये सूट देण्याची मागणी ऑस्ट्रेलियन सरकारकडे केली होती. आपली मागणी मान्य झाल्याचा दावा करत जोकोविच मेलबर्नमध्ये दाखल झाला.  त्यावेळी त्याला विमानतळावरच अडवण्यात आले. त्यानंतर त्याची रवानगी इमिग्रेशन सेंटरमध्ये करण्यात आली. सरकारच्या निर्णयाला जोकोविचने ऑस्ट्रेलियातील कोर्टात आव्हान दिले होते. विराटनं राजीनामा देताच टीम इंडियात बदलाचे वारे, 2 जागांसाठी 3 जणांमध्ये स्पर्धा जोकोविचचे पहिले अपिल कोर्टाने मान्य केले. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियन सरकारने त्यांचे अधिकार वापरत  जोकोविचचा व्हिसा रद्द केला नागरिकांच्या हितासाठी, स्थलांतर कायद्यातील 133 C (3) कलमाच्या अंतर्गत जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा अधिकार सरकार वापरत आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलियाच्या इमिग्रेशन मंत्र्यांनी दिली होती. त्यानंतर फेडरल कोर्टानेही सरकारचा निर्णय मान्य केल्यानं जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपन न खेळतातच परत जावं लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या