JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 7 टी-20 आणि 3 वनडे, असे आहे टीम इंडियाचे जानेवारीतील वेळापत्रक

7 टी-20 आणि 3 वनडे, असे आहे टीम इंडियाचे जानेवारीतील वेळापत्रक

क्रिकेट चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी, एका क्लिकवर जाणून घ्या टीम इंडियाचे जानेवारीतील वेळापत्रक.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 डिसेंबर : यावर्षाचा शेवट भारतीय संघानं वेस्ट इंडिजविरुद्ध टी -20 आणि एकदिवसीय मालिका जिंकत केला. तर नववर्षात भारतीय संघ पहिली मालिका श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. 2019 हे वर्ष भारतीय संघासाठी खास राहिले. वर्ल्ड कप 2019 वगळता भारतीय संघानं सर्व मालिकांमध्ये आपले वर्चस्व गाजवले. दरम्यान आता आता जानेवारी महिन्यात भारतीय संघाला तीन संघांसोबत सामने खेळायचे आहेत. यात श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या दिग्गज संघांचा समावेश आहे. यात भारतीय संघ जास्तीत जास्त टी-20 सामने खेळणार आहे. याचे कारण म्हणजे पुढच्याच वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. वर्ल्ड कप 2019नंतर भारतीय संघानं वेस्ट इंडिज दौरा केला, त्यानंतर सर्व सामने भारतात झाले आहेत. आता श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर भारतीय संघ 24 जानेवारीला न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. वाचा- युवा गोलंदाजानं उडवली मुंबईच्या फलंदाजांची झोप, 2 तासात संपूर्ण संघ ‘ऑल आऊट’ जानेवारी महिन्यात सर्वात आधी श्रीलंकाविरुद्ध भारतीय संघ तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका 5 जानेवारीपासून गुवाहाटी येथून सुरू होईल. त्यानंतर 7 जानेवारी रोजी इंदूरमध्ये दुसरा सामना होईल. तर तिसरा आणि शेवटचा सामना पुण्यात होणार आहे. श्रीलंकेविरुद्ध मालिका 05 जानेवारी: पहिला टी-20 (गुवाहाटी) 07 जानेवारी: दुसरा टी-20 (इंदूर) 09 जानेवारी: तिसरा टी-20 (पुणे) श्रीलंकेविरुद्ध टी-20 सामन्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरोधात एकदिवसीय सामने खेळणार आहे. हे सामने मुंबई, राजकोट आणि बंगळुरू येथे होणार आहेत. वाचा- गांगुलीची ‘दादागिरी’, बुमराहसाठी बदलला क्रिकेटमधला सर्वात महत्त्वाचा नियम ऑस्ट्रेलिया एकदिवसीय दौरा 14 जानेवारी: पहिली वनडे (मुंबई) 17 जानेवारी: दुसरी वनडे (राजकोट) 19 जानेवारी: तिसरी वनडे (बेंगळुरू) त्यानंतर भारतीय संघ 2020मध्ये पहिला परदेश दौरा न्यूझीलंड विरोधात करणार आहे. वाचा- श्रीलंका, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा! बुमराहचा कमबॅक न्यूझीलंडविरुद्ध टी-20 24 जानेवारी: पहिली टी-20 (ऑकलंड) 26 जानेवारी: दुसरी टी-20 (ऑकलंड) 29 जानेवारी: तिसरी टी-20 (ऑकलंड) 31 जानेवारी: चौथी टी-20 (ऑकलंड)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या