JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / एजाझ पटेलसाठी मुंबई कसोटी अधिक संस्मरणीय; Team Indiaने दिले खास गिफ्ट

एजाझ पटेलसाठी मुंबई कसोटी अधिक संस्मरणीय; Team Indiaने दिले खास गिफ्ट

भारतविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील एका डावात 10 गडी बाद करण्याची किमया करणाऱ्या एजाझ पटेलला (Ajaz Patel) टीम इंडियाने दिले खास गिफ्ट.

जाहिरात

IND vs NZ Test Series

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 डिसेंबर: भारतीय संघाने सोमवारी अवघ्या 43 मिनिटांत न्यूझीलंडच्या पाच फलंदाजांना माघारी धाडत दुसरी कसोटी (IND vs NZ Test Series)जिंकली. मात्र, क्रिकेट जगतात चर्चा सुरु आहे ती म्हणजे, किवींचा मुंबईकर म्हणजेच स्पिनर एजाझ पटेलची(Ajaz Patel). एजाझ पटेलने कसोटी सामन्याच्या एका डावात 10 गडी बाद करण्याची किमया केली. अशी कामगिरी करणारा एजाझ हा जगातील तिसरा गोलंदाज ठरला. त्याच कारणास्तव टीम इंडियाने (Team India)त्याला खास गिफ्ट दिले आहे. न्यूझीलंडचा एजाझ पटेल हा कसोटी क्रिकेटच्या एका डावात 10 बळी घेणारा जगातील तिसरा आणि न्यूझीलंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ही कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीवर खूश होत टीम इंडियाने त्याचे अभिनंदन तर केलेच शिवाय एक खास भेटही दिली. सामन्यानंतर अश्विन एजाज पटेलची मुलाखत घेताना दिसला. यानंतर त्यांनी एजाजला टीम इंडियाची जर्सी भेट दिली. या जर्सीवर टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी स्वाक्षरी केली होती. हे खास गिफ्ट मिळाल्याने एजाज खूपच खूश दिसत होता. न्यूझीलंडने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर करण्यता आला आहे.

तसेच, मुबंई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांनी कसोटी सामना संपल्यानंतर एजाझ पटेलचा सत्कार केला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्याची धावपत्रिका आणि स्मृतिचिन्ह देऊन एजाझ पटेलचा एमसीएने सन्मान केला. एजाझ पटेलनेही 10 गडी बाद केलेला ऐतिहासिक चेंडू आणि आपली सामन्यात वापरलेली जर्सी आठवण म्हणून MCA कडे सुपूर्द केली.

एजाझ पटेलचा जन्म मुंबईचा आहे. 8 वर्षांचा असताना तो पालकांसह न्यूझीलंडला गेला आणि आता न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या