JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पाकिस्तान T20 World Cup जिंकणार नाही! रिकी पॉण्टिंगने सांगितलं कारण

पाकिस्तान T20 World Cup जिंकणार नाही! रिकी पॉण्टिंगने सांगितलं कारण

ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) प्रत्येक टीमने तयारीला सुरूवात केली आहे. ऑस्ट्रेलियाला 2 वनडे वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) याने मात्र यंदाचा टी-20 वर्ल्ड कप पाकिस्तानला (Pakistan) जिंकता येणार नाही, असं भाकीत वर्तवलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 जुलै : ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) प्रत्येक टीमने तयारीला सुरूवात केली आहे. ऑस्ट्रेलियाला 2 वनडे वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) याने मात्र यंदाचा टी-20 वर्ल्ड कप पाकिस्तानला (Pakistan) जिंकता येणार नाही, असं भाकीत वर्तवलं आहे. यासाठी त्याने कारणही सांगितलं आहे. आयसीसी रिव्ह्यू या आयसीसीच्या खास कार्यक्रमामध्ये रिकी पॉण्टिंग बोलत होता. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची फायनलला पोहोचण्याची शक्यता कमी आहे, कारण त्यांची बॅटिंग बाबर आझमवर प्रमाणापेक्षा जास्त अवलंबून आहे, असं रिकी पॉण्टिंग म्हणाला. ‘मी बाबर आझमला दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज खेळताना पाहिलं. मी तेव्हाही म्हणालो होतो, या मुलासाठी आकाशही ठेंगणं आहे. तो मागच्या दोन वर्षांमध्ये कमालीचा सुधारला आहे, पण बाबर आझमसाठी स्पर्धा निराशाजनक झाली तर मात्र त्यांना वर्ल्ड कप जिंकता येणार नाही,’ अशी प्रतिक्रिया पॉण्टिंगने दिली. ‘पाकिस्तानचे ओपनर आणि त्यांचे नव्या बॉलने बॉलिंग करणारे बॉलर सगळ्यात महत्त्वाचे आहेत. पाकिस्तानच्या गेल्या काही काळातल्या यशामध्ये त्यांचं योगदान सर्वाधिक आहे. पण ऑस्ट्रेलियात खेळपट्टी स्पिन बॉलिंगला फारसा प्रतिसाद देणार नाही, त्यामुळे त्यांच्या स्पिनरसाठी गोष्टी कठीण असतील,’ असं वक्तव्य पॉण्टिंगने केलं. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वकार युनूस (Waqar Younis) याला मात्र ऑस्ट्रेलियातला टी-20 वर्ल्ड कप पाकिस्तानला जिंकण्याची सर्वोत्तम संधी आहे, असं वाटतं. ऑस्ट्रेलियातल्या खेळपट्ट्या बॅटिंगला मदत करणाऱ्या आहेत आणि पाकिस्तानची बॅटिंग उत्कृष्ट आहे, असं वकार आयसीसी डिजीटलला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला. मागच्या वर्षी युएईमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने उल्लेखनीय कामगिरी केली होती. वर्ल्ड कप इतिहासात पाकिस्तानने पहिल्यांदाच भारताचा पराभव केला होता. पुढे पाकिस्तानची टीम सेमी फायनलमध्ये पोहोचली, तर भारताचं आव्हान ग्रुप स्टेजलाच संपुष्टात आलं. सेमी फायनलमध्ये मात्र पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा धक्का बसला. पुढे फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला हरवत पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कपची ट्रॉफी पटकावली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या