JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / VIDEO ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा अजब किस्सा; 'त्या' दोघांनी चक्क बुटात बिअर ओतुन पिली

VIDEO ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा अजब किस्सा; 'त्या' दोघांनी चक्क बुटात बिअर ओतुन पिली

विजयाचा जल्लोष करताना ऑस्ट्रेलियाच्या (AUS vs NZ) खेळाडूंमध्ये एक अजब किस्सा पाहायला मिळाला. सध्या तो तुफान व्हायरल होत आहे.

जाहिरात

Australia

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दुबई, 15 नोव्हेंबर: टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (T20 World Cup Final) ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा (Australia vs New Zealand) पराभव करत पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने पाच वनडे वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं होतं. या विजयाचा जल्लोष करताना ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमध्ये एक अजब किस्सा पाहायला मिळाला. विजय साजरा करताना ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूने चक्क बिअर बुटात (T20 World Cup 2021 Australian team dressing room wade stoinis drinking beer in shoes watch video) ओतुन पिली. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियाव तुफान व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर आयसीसीने आपल्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला ज्यामध्ये मैथ्यू वेड (Matthew Wade) आणि मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) श्यूजमध्ये बिअर ओतून पिताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या

याआधी ऑस्ट्रेलियाने पाच वनडे वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं होतं, त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या नावावर आता रेकॉर्ड 6 वर्ल्ड कप आहेत. न्यूझीलंडने दिलेलं 173 रनचं आव्हान ऑस्ट्रेलियाने फक्त दोन विकेट गमावून अगदी सहज पार केलं. मिचेल मार्शने 50 बॉलमध्ये नाबाद 77 रन केले. मार्शच्या या खेळीमध्ये 6 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर डेव्हिड वॉर्नर 38 बॉलमध्ये 53 रन करून आऊट झाला. ग्लेन मॅक्सवेल 18 बॉलमध्ये नाबाद 28 रनवर राहिला. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्टचं यशस्वी ठरला. 4 ओव्हरमध्ये 18 रन देऊन बोल्टने 2 विकेट घेतल्या. याशिवाय कोणत्याही बॉलरला विकेट मिळाली नाही. यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जल्लोष साजरा केला. आयसीसीने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉइनिस शूजमध्ये बिअर पिताना दिसत आहेत. वेडने श्यूज काढला आणि त्यात बिअर ओतली आणि मग प्यायली. यानंतर स्टोइनिसने तोच श्यूज घेतला आणि तो बिअर पिताना दिसला. अवघ्या 20 मिनिटांत हा व्हिडिओ 30 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच T20 वर्ल्ड कप जिंकला. T20 विश्वविजेतेपद पटकावणारा हा सहावा देश ठरला. त्याआधी भारत, श्रीलंका, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि इंग्लंडने हे विजेतेपद पटकावले होते. डेव्हिड वॉर्नरला टूर्नामेंटचा सामनावीर तर मार्शला अंतिम सामन्यात सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर यांनीही दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची उत्कृष्ट भागीदारी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या