JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Shane Warne Death : 'शेन वॉर्नच्या मृत्यूने धक्क्यात पण...' त्या वक्तव्यामुळे गावसकर अडचणीत

Shane Warne Death : 'शेन वॉर्नच्या मृत्यूने धक्क्यात पण...' त्या वक्तव्यामुळे गावसकर अडचणीत

ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne Death) याचं 4 मार्चला हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झालं. शेन वॉर्नच्या मृत्यूवेळी सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे अडचणीत सापडले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 मार्च : ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne Death) याचं 4 मार्चला हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झालं. थायलंडमध्ये सुट्टीसाठी गेलेला असतानाच शेन वॉर्नला व्हिलामध्ये हृदयविकाराचा त्रास होऊ लागला, पण रुग्णालयात नेल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं. शेन वॉर्नच्या मृत्यूने क्रिकेटपटूंसोबतच जगभरातल्या क्रिकेटप्रेमींनी हळहळ व्यक्त केली, पण भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) शेन वॉर्नबद्दलच्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. भारतीय स्पिनर आणि मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) शेन वॉर्नपेक्षा चांगले होते, असं गावसकर इंडिया टुडेसोबत बोलताना म्हणाले. वॉर्नने टेस्ट क्रिकेटमध्ये 708 आणि वनडेमध्ये 293 विकेट घेतल्या होत्या, पण गावसकरांच्या मते वॉर्नपेक्षा मुरलीधरन चांगला स्पिनर होता. ‘माझ्यासाठी भारतीय स्पिनर आणि मुथय्या मुरलीधरन वॉर्नपेक्षा चांगले बॉलर होते. कारण वॉर्नचं भारतातलं रेकॉर्ड बघा. भारतामधलं त्याचं रेकॉर्ड फारच सामान्य आहे. भारतामध्ये त्याला फार यश मिळालं नाही. भारतीय खेळाडू स्पिन बॉलिंग चांगली खेळतात, पण मुथय्या मुरलीधरनचं भारताविरुद्धचं रेकॉर्ड उत्कृष्ट आहे, त्यामुळे माझ्या मते मुरलीधरन हा वॉर्नपेक्षा चांगला बॉलर आहे,’ असं गावसकर म्हणाले. ‘शेन वॉर्नने नेहमीच त्याचं आयुष्य एन्जॉय केलं. तो राजासारखं आयुष्य जगला. शेन वॉर्नच्या जाण्याने मीदेखील धक्क्यात आहे, माझा अजूनही विश्वास बसत नाहीये,’ अशी प्रतिक्रिया गावसकरांनी दिली. शेन वॉर्नचं निधन झालेलं असताना त्याच्यापेक्षा मुरलीधरन आणि भारतीय स्पिनर चांगले असल्याचं म्हणणं अनेकांना पटलं नाही. सोशल मीडियावरून अनेक यूजर्सनी सुनिल गावसकरांच्या या टायमिंगवर टीका केली आहे.

संबंधित बातम्या

जाहिरात
जाहिरात
जाहिरात

दरम्यान शेन वॉर्नच्या मृत्यूबाबत थायलंड पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टबाबत माहिती दिली आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांना पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळाला आहे. यामध्ये शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. पोलीस याबाबत लवकरच वकिलांशी बोलणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या