मुंबई, 27 डिसेंबर: प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League) आठव्या सिझनची रंगत वाढत आहे. या स्पर्धेतील सर्व टीमच्या किमान 2 मॅच झाल्या असून आता तिसरा राऊंड सुरू आहे. माजी विजेता यू मुंबाची (U Mumba) टीम 2 सामन्यानंतर 1 विजय आणि 1 पराभवासह 6 पॉईंट्स घेऊन पाचव्या क्रमांकावर आहे. यू मुंबाची सोमवारी लढत तामिळ थलयवाज (Tamil Thalaivas) शी होत आहे. थलयवाजला या सिझनमध्ये अद्याप एकही विजय मिळालेला नाही. सध्या ही टीम पॉईंट टेबलमध्ये 11 व्या क्रमांकावर आहे. यू मुंबानं तामिळ थलयवाजचा पराभव करत 5 पॉईंट्सची कमाई केली तर मुंबा टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. मुंबाची भिस्त ही कॅप्टन फजल अत्रचालीच्या प्लॅनिंगवर असेल. इराणचा हा खेळाडू त्याच्या भक्कम बचावासाठी कबड्डीविश्वात प्रसिद्ध आहे. तर अभिषेक सिंहवर रेडिंगची मदार असेल. प्रो कबड्डी लीगमधील सोमवारचा अन्य एक सामना जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध यूपी योद्धा यांच्यात होणार आहे. जयपूरची टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये आठव्या तर यूपी योद्धाची टीम सातव्या क्रमांकावर आहे. IND vs SA : 29 वर्षात झाले नाही ते आज होणार? टीम इंडिया आणि राहुलला इतिहास घडवण्याची संधी PKL 8 मध्ये 27 डिसेबर रोजी किती सामने आहेत? पीकेएल-8 मध्ये 27 डिसेंबर रोजी 2 सामने होणार आहेत. यामधील पहिला सामना यू मुंबा विरुद्ध तामिळ थलयवाज यांच्यात होईल. तर दुसरा सामना जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध यूपी योद्धा यांच्यात होणार आहे. PKL 8 मधील आजचे सामने कधी सुरू होतील? आज दोन सामने आहेत. पहिला सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. दुसरा त्यानंतर बरोबर एक तासांनी म्हणजेच रात्री 8.30 वाजता सुरू होईल. PKL 8 मधील सामन्यांचे थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल? भारतामध्ये या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण ‘स्टार स्पोर्ट्स नेटवर्क’ वर पाहता येणार आहे. PKL 8 चे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल? डिस्नी+हॉटस्टार ऍप आणि वेबसाईट कबड्डी मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.