मुंबई, 23 डिसेंबर : प्रो कबड्डील लीगच्या (Pro Kabaddi League) आठव्या सिझनला जोरदार सुरुवात झाली आहे. आज (गुरुवार) लीगमध्ये तीन सामने होणार आहेत. या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम पाटणा पायरेट्स (Patna-Pirates) गुरुवारी आठव्या सिझनची सुरूवात करणार आहे. 3 वेळा पीकेएल (PKL) विजेतेपद पटकावणाऱ्या पाटणाची पहिली लढत हरियाणा स्टीलर्स (Haryana Steelers) विरुद्ध होणार आहे. त्याचबरोबर आज जयपूर पिंक पँथर्स, गुजरात जायंट्स, दबंग दिल्ली आणि महाराष्ट्रातील पुणेरी पलटण या टीम देखील त्यांच्या अभियाला सुरुवात करणार आहेत. प्रो कबड्डी लीगची सुरूवात जोरदार झाली. तामिळ थलयवाज आणि तेलुगु टायटन्समधील लढत बरोबरीत सुटली. तर यू मुंबा आणि बंगाल वॉरियर्सनी पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवला. या विजयानं या स्पर्धेची रंगत आणखी वाढली आहे. या सिझनमधील पहिले चार दिवस आणि नंतर शनिवार-रविवार तीन मॅच होणार आहेत. गुरुवारी होणाऱ्या मॅच कुठं पाहता येतील ते बघूया OMG: एजाझ पटेलच नाही तर ‘या’ खेळाडूंनाही मिळाली ऐतिहासिक कामगिरीची शिक्षा PKL 8 मध्ये 23 डिसेबरला किती सामने आहेत? पीकेएल-8 मध्ये 23 डिसेंबर रोजी 3 सामने होणार आहेत. यामधील पहिला सामना गुजरात जायंट्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध होईल. त्यानंतर पुणेरी पलटण आणि दिल्ली दबंग एकमेकांना भिडतील. तर तिसरा आणि शेवटचा सामना पाटणा पायरेट्स आणि हरियाणा स्टीलर्स यांच्यात होईल. PKL 8 मधील आजचे सामने कधी सुरू होतील? आज तीन सामने आहेत. पहिला सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. दुसरा त्यानंतर बरोबर एक तासांनी सुरू होईल. तर तिसरा आणि शेवटचा सामना रात्री 9.30 वाजता खेळला जाणार आहे. PKL 8 मधील सामन्यांचे थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल? भारतामध्ये या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण ‘स्टार स्पोर्ट्स नेटवर्क’ वर पाहता येणार आहे. PKL 8 चे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल? डिस्नी+हॉटस्टार ऍप आणि वेबसाईट कबड्डी मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.