दबंग दिल्लीची टीम पॉईंट टेबलमध्ये सध्या टॉपवर आहे. (फोटो PKL)
मुंबई, 29 डिसेंबर : प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro kabaddi league 2021) बुधवारी दोन सामने होणार आहेत. यापैकी पहिला सामना दबंग दिल्ली विरुद्ध बंगाल वॉरियर्स (Dabang Delhi vs Bengal Warriors) या मागील सिझनची फायनल खेळलेल्या टीममध्ये आहे. मागील सिझनमध्ये (PKL Season 6) दिल्लीची वाटचाल बंगालनं फायनलमध्ये रोखली आणि विजेतेपद पटकावले होते. बुधवारच्या सामन्यात या पराभवाचा बदला घेण्याची संधी दिल्लीला आहे. दिल्ली आणि बंगाल या दोन्ही टीमनं या सिझनमध्ये 3 सामने खेळले असून त्यापैकी 2 सामने जिंकले आहेत, तर एकामध्ये पराभव स्वीकारला आहे. पण, मॅचमध्ये कमावलेल्या पॉईंट्सच्या आधारावर दिल्लीची टीम पहिल्या तर बंगालची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. या सिझनमध्ये सर्वाधिक रेड पॉईंट्स घेणाऱ्या नवीन कुमारवर (Naveen Kumar) दिल्लीची भिस्त असेल. ‘नवीन एक्स्प्रेस’ ला रोखण्याचं तंत्र बंगालनं मागील फायनलमध्ये दाखवलं होतं. त्यामुळे यंदा नवीन आणि बंगालचे डिफेंडर्स यांच्यात तगडी लढत पाहयला मिळू शकते. या स्पर्धेतील दुसरा सामना गुजरात सुपर जायंट्स विरुद्ध यूपी योद्धा (Gujarat Giants vs UP Yoddha) यांच्यात आहे. गुजरात जायंट्स सध्या सातव्या तर यूपी योद्धा नवव्या क्रमांकावर आहे. टॉप 4 च्या दिशेनं प्रवास सुरू करण्यासाठी दोन्ही टीमना या लढतीमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे. कसा सुरू झाला ‘नवीन एक्स्प्रेस’चा प्रवास, स्टार रेडरनं बदलला स्पर्धेचा इतिहास PKL 8 मध्ये 29 डिसेबर रोजी किती सामने आहेत? पीकेएल-8 मध्ये 27 डिसेंबर रोजी 2 सामने होणार आहेत. यामधील पहिला सामना दबंग दिल्ली विरुद्ध बंगाल वॉरियर्स यांच्यात होईल. तर दुसरा सामना गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी योद्धा यांच्यात होणार आहे. PKL 8 मधील आजचे सामने कधी सुरू होतील? आज दोन सामने आहेत. पहिला सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. दुसरा त्यानंतर बरोबर एक तासांनी म्हणजेच रात्री 8.30 वाजता सुरू होईल. PKL 8 मधील सामन्यांचे थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल? भारतामध्ये या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण ‘स्टार स्पोर्ट्स नेटवर्क’ वर पाहता येणार आहे. PKL 8 चे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल? डिस्नी+हॉटस्टार ऍप आणि वेबसाईटवर कबड्डी मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.