'तुझ्यासाठी तब्बल 2 वर्षे प्रतीक्षा केलीय' करिना कपूरची पोस्ट नेमकी कुणासाठी?
मुंबई, 04 फेब्रुवारी: बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेत्री (Kareena Kapoor Khan) करीना कपूर खान चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय आणि सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. तिच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील घडामोडीबाबत नेहमीच सर्वांना उत्सुकता असते. आपल्या दुसऱ्या मुलाच्या जहांगीर अली खान (Jehangir Ali Khan) याच्या जन्मामुळे चित्रपटांपासून दूर राहिलेली करीना कपूर आता कधी काम सुरू करणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. आता करीना कपूर खान ‘कहानी’ चित्रपटाचा दिग्दर्शक सुजॉय घोषच्या (Sujoy Ghosh) एका रहस्यमय चित्रपटाद्वारे कामाचा शुभारंभ करणार असल्याचं निश्चित झालं आहे. हा चित्रपट कीगो हिगाशिनोच्या ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ चा (The Devotion of Suspect X) हिंदी रिमेक आहे. यात जयदीप अहलावत आणि विजय वर्मा यांचीही प्रमुख भूमिका आहे. मार्चमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. हिगाशिनोच्या या कादंबरीत एका अविवाहित आईची कथा आहे. ती चुकून आपल्या पूर्व पतीला ठार मारते. 2015 मध्येच सुजॉयने या चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हा यातील मुख्य भूमिकेसाठी सैफ अली खानची (Saif Ali khan) निवड केली होती, मात्र काही कारणांनी तेव्हा या चित्रपटाचं काम सुरू होऊ शकलं नाही. आता सात वर्षांनी सुजॉय घोषनं या चित्रपटाची घोषणा केली असून, त्यात सैफची पत्नी करीना कपूर काम करणार आहे. हे वाचा- Gangubai Kathiawadi: आजाद मैदान में गंगुबाई! आलियाचा जबरदस्त अवतार आला समोर लवकरच या चित्रपटातील भूमिकेच्या तयारीसाठी या कलाकारांच्या वर्कशॉप्सना सुरुवात होणार असल्याचं वृत्त आहे. नियोजित वेळापत्रकात कोणताही अडथळा न आल्यास पुढच्या महिन्यात पश्चिम बंगालमधील (West Bengal) एका हिल स्टेशनवर या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल. करीनानेही या चित्रपटातील आपल्या भूमिकेसाठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, करीना आपल्या ‘लालसिंग चढ्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेनं वाट पाहत आहे. आमिर खानची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट हॉलीवूडमधील ‘फॉरेस्ट गंप’ या गाजलेल्या चित्रपटावर आधारित आहे. 14 एप्रिल रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. याशिवाय करीना एकता कपूर आणि हंसल मेहतासोबतचा एक चित्रपटही करणार असून, याचं नाव अद्याप निश्चित झालेलं नाही. करण जोहरच्या भव्यदिव्य ‘तख्त’ या चित्रपटातही ती महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हे वाचा- लग्नाच्या 2 महिन्यातच अंकिता लोखंडे देणार गुडन्यूज? खास पूजेचा video viral थोडक्यात, एका वर्षांच्या ब्रेकनंतर करीना दमदार चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून पुन्हा एकदा मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे.