JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Singapore Open: तीन मॅचनंतर अखेर सायना बॅक इन फॉर्म; मालविका बनसोडला काही मिनिटांत हरवलं

Singapore Open: तीन मॅचनंतर अखेर सायना बॅक इन फॉर्म; मालविका बनसोडला काही मिनिटांत हरवलं

साईनाला याआधी सलग तीन मॅचेसमध्ये हार पत्करावी लागली होती. ती अपयशाची मालिका या यशाच्या साह्याने तिने खंडित केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जुलै: सिंगापूर ओपन सुपर 500 बॅडमिंटन टुर्नामेंट सध्या सुरु आहे. ही टूर्नामेंट 12 जुलैपासून सुरु झाली आहे.  येत्या 17 जुलैपर्यंत ही टूर्नामेंट असणार आहे. भारताची नामवंत बॅडमिंटनपटू साईना नेहवालने (Saina Nehwal) सिंगापूर ओपन सुपर 500 बॅडमिंटन टुर्नामेंटची (Singapore Open Super Badminton Tournament) सुरुवात यशाने केली आहे. स्पर्धेच्या ओपनिंग राउंडमध्ये मालविका बनसोडला तिने 21-18, 21-14 अशा सेट्समध्ये हरवलं. 34 मिनिटं ही मॅच सुरू होती. साईनाला याआधी सलग तीन मॅचेसमध्ये हार पत्करावी लागली होती. ती अपयशाची मालिका या यशाच्या साह्याने तिने खंडित केली आहे. ‘अमर उजाला’ने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या मॅचमध्ये साईनाची प्रतिस्पर्धी होती 20 वर्षांची मालविका बनसोड (Malvika Bansod). मालविका साईनालाच आपला आदर्श मानते. तिच्याविरुद्ध खेळताना मालविकाने सकारात्मक खेळाचं दर्शन घडवलं. तिने पहिल्या गेममध्ये ब्रेकपर्यंत 11-9 अशी आघाडी कायम राखली होती. त्यानंतर तिने 18-16 अशी आघाडी घेतली; मात्र त्यानंतर साईनाने आघाडी घेतली आणि 21-18 अशा प्रकारे पहिल्या गेममध्ये 17 मिनिटांत विजय प्राप्त केला. KL Rahul - Athiya shetty लवकरच करणार लग्न! मुंबईत होणार जंगी विवाह

दुसऱ्या गेममध्ये मालविकाचा जम बसेपर्यंत साईनाने 10-3 अशी आघाडी घेतली. ब्रेकच्या वेळी ती 11-6 अशी आघाडीवर होती. त्यानंतर मालविकाने पुनरागमनाचा खूप प्रयत्न केला; मात्र शेवटी साईनाचा अनुभव कामी आला आणि तिने 21-14 अशा सात गुणांच्या फरकाने दुसरा गेम खिशात टाकला. एकूण 34 मिनिटांत साईनाने ही मॅच जिंकली.

लंडन ऑलिम्पिकमध्ये साईनाला कास्यपदक मिळालं होतं. तिला सलग तीन टुर्नामेंट्सच्या पहिल्या मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला होता. यंदा जानेवारी महिन्यात मालविकाने साईनाला हरवलं होतं. त्यामुळे 2007नंतर साईनाला हरवणारी मालविका ही दुसरी भारतीय खेळाडू बनली होती. आज मात्र तिला साईनाने हरवलं आहे. याआधी भारताच्या उदयोन्मुख बॅडमिंटनपटूंपैकी मिथुन मंजुनाथ (Mithun Manjunath) आणि अस्मिता चालिहा (Asmita Chaliha) यांनी सिंगापूर ओपन सुपर 500 टुर्नामेंटच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. मंजुनाथने किदांबी श्रीकांतला, तर अस्मिताने जागतिक क्रमवारीत 12वं स्थान असलेली थायलंडची बुसानन ओंगबामरुंगफान हिला हरवलं. VIDEO : दिनेश चंडिमलचा खतरनाक सिक्स,थेट रस्त्यावरच्या मुलावर आदळला बॉल

दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळवलेली (P. V. Sindhu) पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणय (H. S. Pranoy) यांनीही दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवण्यात यश मिळवलं. सिंधूने महिला एकेरी प्रकारात जागतिक क्रमवारीत 36वा क्रमांक असलेली बेल्जियमची लियाने टॅन हिला 21-15, 21-11 असं हरवलं. एच. एस. प्रणयने थायलंडच्या सित्थिकॉम थाममासिनला 21-13, 21-16 असं हरवून आपला प्रवेश निश्चित केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या