श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट, लवकरच मैदानावर परतणार?
मुंबई, 21 एप्रिल : भारताचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर मागील काही महिन्यांपासून दुखापतीच्या कारणास्थव क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. या दुखापतीमुळेच यंदाच्या आयपीएलला देखील तो मुकला आहे. अशातच श्रेयसच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. श्रेयस अय्यरच्या पाठीच्या दुखापतीवर लंडन येथे शस्त्रक्रिया पारपडल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी श्रेयसच्या दुखऱ्या पाठीवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया झाल्याची माहिती मिळाली आहे. या शस्त्रक्रियेमधून पूर्णपणे बरे होण्यास श्रेयस अय्यर ला तब्बल तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा भाग असणार नाही. यामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्यासाठी श्रेयसची रिप्लेसमेंट शोधावी लागणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पारपडलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात श्रेयस अय्यरची पाठीची दुखापत बळावली होती. त्यामुळे त्याला चौथा सामना अर्ध्यातूनच सोडावा लागला होता. यानंतर डॉक्टरांनी त्याला काही आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. परंतु यानंतर देखील त्याच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे त्याच्यावर अखेर शस्त्रक्रिया करण्यात आली. श्रेयस पूर्वी भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पाठीवर फेब्रुवारी महिन्यात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर काहीकाळ विश्रांती घेतल्यावर बुमराहचे बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे पुनर्वसन व्यवस्थापन सुरू झाले आहे. IPL 2023 : धर्माच्या भिंती तोडून, CSK चा स्टार क्रिकेटर अडकला लग्न बंधनात, खूपच रंजक आहे त्यांची प्रेम कहाणी श्रेयस अय्यर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा भाग होणार नसला, तरी ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात पुनरागमन करेल असे बोलले जात आहे.