JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Cricket News : धक्कादायक! तीन महिने हातात बॅटही पकडू शकणार नाही टीम इंडियाचा ‘हा’ क्रिकेटर, IPL सोबत WTC फायनललाही मुकणार

Cricket News : धक्कादायक! तीन महिने हातात बॅटही पकडू शकणार नाही टीम इंडियाचा ‘हा’ क्रिकेटर, IPL सोबत WTC फायनललाही मुकणार

टीम इंडियावरील दुखापतीच ग्रहण जाण्याचं नाव घेत नाही. आता जसप्रीत बुमराहनंतर भारताचा अजून एक स्टार फलंदाज दुखापतीमुळे आयपीएल 2023 सह वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या फायनलला मुकणार असल्याची माहिती समोर येत आहे.

जाहिरात

तीन महिने हातात बॅटही पकडू शकणार नाही टीम इंडियाचा ‘हा’ क्रिकेटर, IPL सोबत WTC फायनललाही मुकणार

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 एप्रिल : भारतीय क्रिकेट संघ आणि त्यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियावरील दुखापतीच ग्रहण जाण्याचं नाव घेत नाही.  आता जसप्रीत बुमराहनंतर भारताचा अजून एक स्टार फलंदाज दुखापतीमुळे आयपीएल 2023 सह वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या फायनलला मुकणार असल्याची माहिती समोर येत आहे. भारताचा युवा फलंदाज आणि आयपीएलमधील केकेआर संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर मागील अनेक दिवसांपासून त्याच्या पाठीच्या त्रस्त आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्यात श्रेयस अय्यरची पाठीची दुखापत बळावली होती. यामुळे तो चौथ्या कसोटी सामन्यात खेळला नाही. त्यानंतर श्रेयसला डॉक्टरांनी काही आठवडे आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे आयपीएलच्या पहिल्या सत्राला श्रेयस अय्यर मुकणार हे निश्चित होते. परंतु आता त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून यामुळे तो पुढील काही महिने मैदानावर खेळताना दिसणार नाही. श्रेयस अय्यरच्या दुखऱ्या पाठीवर शस्त्रक्रिया केली जाणार असून तो आयपीएल 2023 सह वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या फायनलला देखील मुकणार असल्याची माहिती ईएसपीएन क्रिकइन्फोने दिली आहे. श्रेयसवर परदेशात शस्त्रक्रिया केली जाणार असून यानंतर पुढील तीन महिने तो नियमित क्रिकेट खेळू शकणार नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या फायनलपूर्वी हा टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता जसप्रीत बुमराह, रिषभ पंत आणि आता श्रेयस अय्यर हे टीम इंडियाचे स्टार खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या फायनला मुकणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या