मुंबई, 19 मार्च : पाकिस्तानचा फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) त्याच्या जमान्यातल्या सगळ्यात धोकादायक बॉलरपैकी एक होता. शोएबचे पाकिस्तानमध्येच नाही तर भारतामध्येही चाहते होते. भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात जेव्हा सामना व्हायचा तेव्हा कायमच शोएब चर्चेत असायचा. शोएब अख्तरने त्याच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेयर केला आहे, यात तो एक दिवस सेहवाग मला भेटला तर त्याला खूप मारेन, असं म्हणत आहे. वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) त्याच्या वक्तव्यांनी अनेकवेळा पाकिस्तानी खेळाडूंना ट्रोल करतो. सेहवाग आणि शोएब अख्तर यांचा मैदानातला मुकाबला जोरदार व्हायचा, पण मैदानाबाहेर हे दोघं चांगले मित्र आहेत. सोशल मीडियावर हे दोघं एकमेकांना ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. एका युट्यूब व्हिडिओमध्ये शोएब अख्तर एका चॅट शोचा भाग होता. या कार्यक्रमात शोएबला त्याच्या फोटोवर सेहवागने केलेल्या कमेंटवर विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना सेहवाग कधी भेटला तर त्याला खूप मारेन, असं शोएब अख्तर म्हणाला.
शोएब अख्तरने ट्विटरवर त्याचा सूट-बूट घातलेला फोटो शेयर केला होता. या फोटोवर सेहवागने कमेंट केली होती. ऑर्डर लिहून घे, एक बटर चिकन, दोन नान, एक बियर, अशी कमेंट करत सेहवागने शोएब अख्तरला ट्रोल केलं होतं.