नवी दिल्ली, 4 मार्च : ऑस्ट्रेलियन दिग्गज क्रिकेटर शेन वॉर्न (Australia cricket Shane Warne) याच्या निधनाने जगाला धक्का बसला आहे. क्रिकेट प्रेमींचा अद्यापही या बातमीवर विश्वास बसत नाही. वयाच्या (Australian cricket icon Shane Warne has died aged 52) अवघ्या 52 व्या वर्षी शेन वॉर्न याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. एका विलात ते बेशुद्धावस्थेत आढळल्याचं सांगितलं जात आहे. फॉक्स स्पोर्ट्स न्यूजनुसार, वॉर्न थायलँडच्या कोह सामुईमध्ये होते. तेथील एका विलात ते बेशुद्धावस्थेत होते. यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र त्यांना वाचवता आलं नाही. वॉर्न जगभरातील एकमेव असे खेळाडू आहे, ज्यांनी टेस्टमध्ये 3000+रन तयार केले होते. मात्र कधी शंभर पूर्ण करू शकले नाही. त्यांचं करिअर मैदानाबाहेर अनेकदा वादात राहिलं. मैदानावर आपल्या फिरकी गोलंदाजीसाठी आणि मैदानाबाहेर स्टाईल आणि प्रेम प्रकरणांसाठी शेन वॉर्न अनेकदा चर्चिला गेला आहे. चित्रपटाच्या कथानकाला शोभेल असंच त्याचं आयुष्य आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नने म्हटलं होतं की, माझ्यावर एखादा चित्रपट काढायचा असेल तर माझ्या भूमिकेसाठी शाहरुख खान योग्य आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजीत भरीव कामगिरी करणाऱ्या या गोलंदाजाने अनेक विक्रम केले. एकीकडे मान मिळवणाऱ्या या गोलंदाजाला अनेकदा वादाला सामोरं जावं लागलं. शेन वॉर्नवर चेंडू कुरतडल्याचा तसेच स्लेजिंगचा आरोपही करण्यात आला होता. याशिवाय त्याच्या कथित सेक्स टेपवरूनही चर्चा झाली होती. हे ही वाचा-
क्रिकेट विश्वाला हादरा! क्रिकेटर शेन वॉर्न यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
अभिनेत्री आणि मॉडेल लिज हर्ले सोबत शेन वॉर्नचं अफेअर होतं. कोणत्या अभिनेत्री चित्रपटात असाव्यात यावर सांगताना वॉर्न म्हणाला की, दीपिका पदुकोन आणि प्रियांका चोप्रा या दोन अभिनेत्री आवडतात. या दोघींनाही एकत्र क्रिकेट सामना बघण्यासाठी नेण्याची इच्छाही वॉर्नने बोलून दाखवली होती. शेन वॉर्नने त्याचा पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध 1992 मध्ये खेळला होता. त्याने आयपीएलमध्ये खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. भारताविषयी खास प्रेम असलेल्या वॉर्नला देशात रहायला आणि इथल्या खाद्यपदार्थांची चव चाखायला आवडतं होतं. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा ब्रँड अम्बॅसिडर म्हणून वॉर्न काम करीत होता.