मुंबई, 10 मार्च : ऑस्ट्रेलियाचा महान स्पिन बॉलर शेन वॉर्न (Shane Warne) याने गेल्या शुक्रवारी (4 मार्च 2022) थायलंडमधील (Thailand) त्याच्या व्हिलामध्ये अखेरचा श्वास घेतला. हार्टअॅटक (Heart Attack) आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. शेन वॉर्नच्या मॅनेजमेंट टीमनं एक संक्षिप्त स्टेटमेंट रिलीज करून त्याचं निधन (Shane Warne Death) झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला होता. या स्टेटमेंटनुसार ‘शेन त्याच्या थायलंडमधील व्हिलामध्ये अनरिस्पॉन्सिव्ह कंडिशनमध्ये (Unresponsive Condition) आढळला होता. प्राथमिक तपासात पोलिसांनादेखील काहीच संशयास्पद (Suspicious) आढळलं नव्हतं. मात्र, आता शेन वॉर्नच्या शेवटच्या क्षणांबाबत वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. आता त्याच्या मृत्यूच्या काही तासांपूर्वीचा एक फोटो समोर आला आहे. थायलंडमधील लक्झरी व्हिलातील (Luxury Villa) सीसीटीव्ही फुटेजमधून (CCTV Footage) ही प्रतिमा टिपलेली आहे. मृत्यू होण्याच्या काही तास अगोदर शेन वॉर्न लक्झरी व्हिलातून फेरफटका (Strolling) मारत असल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमधून निदर्शनास आलं आहे. थायलंडमधील कोह सामुई बेटावर (Koh Samui Island) सुट्टी घालवत असताना वॉर्नचं वयाच्या 52व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं. त्याच्या अकाली निधनानं क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला. जगभरातील अनेक सेलिब्रेटिंनी वॉर्नच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. त्याचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्यामुळं झाल्याचं प्राथमिक तपासात निदर्शनास आलं असलं तरी थायलंड पोलिसांनी वॉर्नच्या बॉडीचं पोस्टमॉर्टम केलं, पोस्टमॉर्टममध्येही वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं समोर आलं. पोलिसांच्या हाती आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये वॉर्न थायलंडमधील परशुराम पांडे (Parsuram Panday) या टेलरला (Tailor) भेटून व्हिलामध्ये परतत असल्याचं दिसत आहे. परशुराम पांडे यांनी ‘द सन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, दिग्गज स्पिनर शेन वॉर्ननं मला दुपारच्या वेळी सूट फिटिंगसाठी बोलावलं होतं. तो कोह सामुई बेटावर आराम करण्याच्या अपेक्षेनं आला होता. तो पाच दिवसांच्या सुट्ट्यांबाबत (Holidays) फारच उत्साही दिसत होता. त्याचे सूट बनवणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.’ वॉर्न शनिवारी किंवा रविवारी त्याचे शिवलेले कपडे घेण्यासाठी पुन्हा पांडे यांना भेटणार होता. शिवाय त्याला बारमध्येदेखील जाण्याची इच्छा होती. जेव्हा त्यांनी अचानक वॉर्नचा मृत्यू झाल्याची बातमी पाहिली तेव्हा त्यांना धक्काच बसला, असंही पांडे यांनी सांगितलं. 4 मार्च 2022 रोजी संध्याकाळी पाच वाजता बिझनेस मॅनेजर अँड्र्यू निओफिटौ (Andrew Neophitou) याला वॉर्न त्याच्या रूममध्ये निपचित पडलेला आढळला होता. त्यानंतर त्याला त्याच्या मित्रांनी सीपीआर दिल्याचंही म्हटलं जातं आहे. संध्याकाळी सात वाजता त्याला मृत घोषित करण्यात आलं. मृत्यूच्या कारणाची खात्री करण्यासाठी पोस्टमॉर्टम (Postmortem) देखील करण्यात आले.