नवी दिल्ली, 4 मार्च : ऑस्ट्रेलियन महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नच्या (Australia cricket Shane Warne) निधनाने संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार वयाच्या 52 व्या वर्षी शेन वॉर्नचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मात्र इतका फीट असतानाही त्याला इतक्या कमी वयात हृदयविकाराचा (Australia cricket Shane Warne ्dies due to heart attack) झटका आला, याचं गूढ अद्याप चाहत्यांच्या मनात आहे. वॉर्न आपल्या बंगल्यात बेशुद्धावरस्थेत पडला होता. त्याला तातडीने रुग्णालयात का हलवण्यात आलं नाही? यांसारखे असंख्य प्रश्न चाहत्यांसमोर आहेत. दरम्यान शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं, याबाबतची माहिती समोर आली आहे. शेन वॉर्नचे थायलंडमधील कोह सामुई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्न त्याच्या व्हिलामध्ये बेशुद्धावस्थेत सापडला होता. वैद्यकीय स्टाफने वॉर्नला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्याला वाचवता आले नाही, अशी माहिती सांगण्यात येत आहे. अखेरच्या क्षणी वॉर्नला नेमकं झालं तरी तरी काय, याची माहिती आता समोर आली आहे. वॉर्न बेशुद्ध पडल्याचे त्याच्या वैद्यकीय चमूला समजले आणि त्यांनी त्याच्याकडे धाव घेतली. डॉक्टरांनी त्याला तपासले, पण त्यावेळी वॉर्नने डोळे मिटलेले होते. डॉक्टरांनी यावेळी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यात यश आले नाही. त्यानंतर वॉर्नच्या कुटुंबाने लोकांना गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर याबाबतची अधिक माहिती लवकरच देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. हे ही वाचा- शेन वॉर्नला ‘या’ दोन बॉलिवूड अभिनेत्रींना करायचं होतं डेट; इच्छा राहिली अपूर्ण आज सकाळीच रॉड मार्श यांचे निधन झाले. वॉर्ननेही मार्शच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पण आता खुद्द वॉर्ननेही जगाचा निरोप घेतला आहे. वॉर्न बेशुद्धावस्थेत पडल्याचं कळताच तातडीने वैद्यकीय टीम त्याला तपासण्यासाठी आली. त्यांनी वॉर्नला वाचवण्याचे बरेच प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आलं नाही. तेथेच त्याचा मृत्यू झाला.
सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रॉड मार्श यांच्या निधनावर शोक व्यक्त करणारं ट्विट केलं होतं. त्यांनी लिहलंय की, रॉड मार्श गेल्याची बातमी ऐकून खूप दुःख झालं. तो क्रिकेटमधील महान खेळाडू होता आणि अनेक तरुण मुला-मुलींसाठी एक प्रेरणा होता. रॉडला क्रिकेटची खूप काळजी होती आणि त्यांनी क्रिकेटला खूप काही दिलं. विशेषतः ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना त्यांनी खूप काही दिलं. या बिकट काळात मी Ros आणि त्यांच्या कुटुंबाच्या भावनांसोबत आहे. RIP