आयपीएलच्या मैदानात एकाच वेळी दोन किंग
कोलकाता: आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ईडन गार्डन्सवर आमनेसामने आले. या सामन्यासाठी ईडन गार्डन्सवर प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली. दरम्यान या सामन्याच्या निमित्तानं तमाम क्रिकेट चाहत्यांना एकाच वेळी दोन किंग क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाले. मैदानात क्रिकेटचा किंग रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं या सामन्यात टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. सामना जरी कोलकात्यात असला तरी क्रिकेटचा किंग आणि आरसीबीचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीचं फॅन फॉलोईंग इथेही फार मोठं आहे. म्हणूनच क्रिकेटच्या किंगला आयपीएलमध्ये खेळताना पाहण्यासाठी ईडन गार्डन्स भरुन गेलं. पण या किंगसोबत आणखी एका ‘किंग’नंही मैदानात हजेरी लावली.
बॉलिवूडचा किंग शाहरुखही ईडन गार्डन्सवर ईडन गार्डन्सवरचा हा दुसरा किंग म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार किंग खान! कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक असलेला शाहरुख आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी प्रेक्षक गॅलरीत दिसला.
यावेळी शाहरुख मैदानात दिसताच प्रेक्षकांनी एकच आवाज केला. शाहरुखनंही हात दाखवून प्रेक्षकांना अभिवादन केलं.