विराट कोहलीला प्रपोज करणारी क्रिकेटर नेटकऱ्यांवर भडकली
मुंबई, 24 फेब्रुवारी : इंग्लंडची माजी क्रिकेटर सारा टेलर हिने काही दिवसांपूर्वीच तिची पार्टनर डायना आई होणार असल्याची माहिती ट्विटरवर पोस्ट शेअर करत दिली होती. या बातमीने अनेकांना आनंद झाला आणि अनेकांना तिची खिल्ली उडवली. नेटकऱ्यांनी साराला तिच्या समलिंगी असण्यावरून बरेच ट्रोल करण्यात आले. या ट्रोलिंगमुळे सारा भडकली आणि तिने तिच्या ट्विटरवरून एकामागून एक ट्विट करत ट्रॉलर्सना प्रतिउत्तर दिले. सारा तीच क्रिकेटर आहे जिने काही वर्षांपूर्वी विराट कोहलीला सोशल मीडियावर प्रपोज केले होते. यानंतर सारा फारच चर्चेत आली होती. साराने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सन्यास घेतला. साराने ट्रॉलर्सना उत्तर देताना लिहिले, “होय मी लेस्बियन आहे आणि मी आनंदी आहे, मला माहित नव्हते की माझ्या जोडीदाराच्या गरोदरपणाची बातमी शेअर केल्यानंतर मला या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. मला आशा आहे की मी काही प्रश्नांची उत्तरे देऊ शकेन. IVF द्वारे अज्ञात व्यक्तीकडून शुक्राणू दान केल्यामुळे ही एक अनोखी संधी माझ्या जोडीदाराला प्राप्त झाली आहे”. IND VS AUS : कर्णधाराच्या आईची प्रकृती खालावली; अर्ध्यात सोडली कसोटी मालिका
19 आठवड्यांनी देणार बाळाला जन्म : सारा टेलरने सोशल मीडियावर जोडीदार डायनासोबतचा फोटो शेअर करताना लिहिले होते की, “तिची जोडीदार डायना ही 19 आठवड्यांनंतर मुलाला जन्म देईल. आई व्हावं अशी डायनाची मनापासून इच्छा होती”. यासोबतच तिने सोशल मीडियावर काही फोटो देखील शेअर केले.