मुंबई, 3 मे: भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आता टोक्यो ऑलिम्पिकची तयारी (Tokyo Olympics 2021) बिनधास्तपणे करु शकेल. सानिया मिर्झा या स्पर्धेच्या तयारीसाठी ब्रिटनला जाणार आहे. मात्र कोरोनामुळे बदललेल्या परिस्थितीमुळे सानियाच्या दोन वर्षांच्या मुलाला व्हिसा देण्यात अडचण येत होती. सानियानं मुलाच्या व्हिसासाठी भारत सरकारला विनंती केली होती. भारत सरकारनं सानियाच्या मागणीचा पाठपुरावा केल्यानं सानियाच्या मुलाचा व्हिसा ब्रिटन सरकारनं मंजूर केला आहे. त्यामुळे आता सानिया मुलाला घेऊन ब्रिटनमध्ये ऑलिम्पिकच्या तयारीसाठी जाऊ शकेल. सानिया 14 जूनपासून बर्मिंगहॅम ओपन, 20 जूनपासून इस्टबर्न ओपन आणि 28 जूनपासून विम्बलडन स्पर्धेत सहभागी होणार आहे. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी सानियाला या दोन स्पर्धांची मोठी मदत होणार आहे. मुलाच्या व्हिसाबाबत सानिया मिर्झानं केलेल्या विनंतीनंतर क्रीडा मंत्रालयानं या प्रकरणात ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्ताला याबाबत मदत करण्याची सूचना केली होती. आता सानियाला व्हिसा मिळाल्यानं ती लवकरच इंग्लंडला रवाना होईल. ब्रिटनमधील नियमानुसार तिला 10 दिवस क्वारंटाईन राहवे लागेल. त्यानंतर ती टोक्यो ऑलिम्पिकची तयारी करु शकेल. फॅन्सनी विचारला धोनीबद्दल प्रश्न, डेव्हिड मिलरचे उत्तर वाचून वाटेल अभिमान महिनाभर खोलीत होती बंद सानिया मिर्झानं काही दिवसांपूर्वीच तिला आलेल्या डिप्रेशनचा खुलासा केला होता. बीजिंगमध्ये 2008 साली झालेल्या ऑलिम्पिकमधून सानियाला दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्यानंतर ती 3-4 महिने डिप्रेशनमध्ये होती. मी जवळपास एक महिना खोलीमध्ये बंद होते. आपण टेनिस पुन्हा खेळू असं मला वाटत नव्हतं. कोणत्याही गोष्टीमुळे मी रडत असे’’ असं सानियानं सांगितलं. अर्थात जिद्दी सानियानं या नैराश्यावर मात करत दमदार पुनरागमन केले आणि अनेक स्पर्धात देशाला अभिमान वाटावी अशी कामगिरी केली आहे.