JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'दिलं चाहता है' म्हणतं सचिन तेंडुलकरने चाहत्यांना विचारला हा प्रश्न

'दिलं चाहता है' म्हणतं सचिन तेंडुलकरने चाहत्यांना विचारला हा प्रश्न

सचिन त्याच्या निवृत्तीनंतर अनेक नवीन गोष्टी एक्सप्लोर करताना दिसतो. अशातच सचिनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून त्यामधून त्याने चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे .

जाहिरात

'दिलं चाहता है' म्हणतं सचिन तेंडुलकरने चाहत्यांना विचारला हा प्रश्न

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 मार्च : भारताचा माजी क्रिकेटर  मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचे चाहते जगभरात आहेत. सचिन त्याच्या निवृत्तीनंतर अनेक नवीन गोष्टी एक्सप्लोर करताना दिसतो. अशातच सचिन सध्या गोव्यात आपल्या मित्रांसोबत सहलीचा आनंद घेत आहे. त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून त्याच्यावर चाहते लाईक्स आणि कमेंट्स चा वर्षाव करीत आहेत. माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने त्याच्या सोशल मीडियावर क्रिकेटर युवराज सिंह आणि अनिल कुंबळे यांच्यासोबत एक फोटो शेअर केलाय. यात तिघेही सहलीच्या मूडमध्ये दिसत असून अनिल कुंबळे एक सेल्फी घेत आहे. याफोटोला सचिनने कॅप्शन देताना लिहिले, " गोव्यात आमची दिल चाहता हे मुमेंट. तुमच्या मते आकाश, समीर आणि सिड कोण आहेत?" देवा मला पाव! पराभवानंतर विराट अनुष्का पोहोचले महाकालेश्वराच्या चरणी

संबंधित बातम्या

सचिनने विचारलेल्या प्रश्नाला त्याच्या चाहत्यांसह स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादव याने देखील उत्तर दिले.  “आकाश सिड समीर या तिघांबद्दल देखील आदर” असे सूर्याने लिहिले. तर कोलकाता नाईट रायडर्सने त्यावर कमेंट करत “ये दोस्ती गेहेरी हे या 3D हे” असे उत्तर दिले. लवकरच मुंबई क्रिकेर असोसिएशन  द्वारे सचिन तेंडुलकर चा पूर्णाकृती पुतळा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर उभारण्यात येणार आहे. सचिनच्या 50 व्या वाढदिवशी या पुतळ्याचे उदघाटन करण्यात येणार असून, काही दिवसांपूर्वी एमसीएसह अध्यक्षांनी याबाबत माहिती दिली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या