JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / जडेजाच्या फिरकीसमोर कांगारुंचे लोटांगण, 6 जण बोल्ड; कपिल देव यांचा विक्रम मोडला

जडेजाच्या फिरकीसमोर कांगारुंचे लोटांगण, 6 जण बोल्ड; कपिल देव यांचा विक्रम मोडला

ऑस्ट्रेलियाच्या 21 षटकात 3 बाद 93 धावा झाल्या होत्या. पण त्यानतंर जडेजाने दोन षटकात 4 विकेट घेतल्या आणि त्यांची अवस्था 7 बाद 95 अशी झाली.

जाहिरात

ravindra jadeja

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 19 फेब्रुवारी : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत दुसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाने गोलंदाजीत कमाल करताना कांगारूंची दाणादाण उडवली. त्याने दुसऱ्या डावात 7 विकेट घेतल्या. दिल्लीच्या खेळपट्टीवर जडेजाच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज हतबल झाले. त्याने 12.1 षटकात 42 धावा देत 7 गडी बाद केले. यापैकी जडेजाने 6 फलंदाजांचा त्रिफळा उडवला. 7 पैकी 6 जण त्रिफळाचीत झाले तर एक जण झेलबाद झाला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या 21 षटकात 3 बाद 93 धावा होत्या. मात्र त्यानंतर पुढच्या तीन षटकातील दोन षटके जडेजाने टाकली. यात त्याने चार जणांना बाद केलं. यामुळे 3 बाद 93 वरून 24 षटकात ऑस्ट्रेलियाची अवस्था 7 बाद 95 अशी झाली. पुढे अखेरच्या तीन फलंदाजांनाही जडेजाने बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आणला. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात होताच पहिले तीन फलंदाज अश्विनने बाद केले तर नंतरचे 7 फलंदाज जडेजाने बाद केले. हेही वाचा :  अश्विनची दहशत, स्मिथला घाबरवलं; विराट कोहलीला आवरेना हसू, VIDEO VIRAL जडेजाने त्याच्या या कामिगिरीसह भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांचा विक्रम मोडला. कपिल देव यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत एकूण 79 विकेट घेतल्या होत्या. त्यांनी 20 कसोटी सामन्यात अशी कामगिरी केली होती. आता जडेजाच्या नावावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 80 विकेट झाल्या आहेत. तसंच ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तो चौथा गोलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलिविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीयांमध्ये अनिल कुंबळे पहिल्या क्रमांकावर आहे. अनिल कुंबळेने 111 विकेट घेतल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अश्विनने 103 विकेट घेतल्यात. तर हरभजन सिंहने 95 विकेट घेतल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या