JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मी लिंबूपाणी पिईन किंवा... Ravi Shastri नी ट्रोर्लसना दिले सडेतोड उत्तर

मी लिंबूपाणी पिईन किंवा... Ravi Shastri नी ट्रोर्लसना दिले सडेतोड उत्तर

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri ) हे अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलच्या निशाण्यावर असतात.

जाहिरात

Ravi Shastri

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri ) हे अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलच्या निशाण्यावर असतात. सोशल मीडियावर त्याच्यावर अनेक मीम्स बनवले जातात. दारूमुळे शास्त्री यांना सर्वाधिक ट्रोल केले जाते. याच मुद्यावरुन रवी शास्त्री यांनी ट्रोर्लसना सडेतोड उत्तर दिले आहे. ट्रोर्लसना प्रत्युत्तर देताना शास्त्री यांनी , मीम्स बनवण्याचा आणि ट्रोलींगचा माझ्यावर कोणताही फरक पडत नसल्याचे म्हटले आहे. शास्त्री यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सगळीकडे विनोद सुरु असतो. ते माझ्या नावावर हसतात, मजा करतात. त्याने मला काय फरत पडतो. असा उलट सवाल त्यांनी प्रसार माध्यमांना केला. तसेच, मी लिंबूपाणी पिईन किंवा दूध आणि मध घेईन, पण तुम्ही प्या. माझ्या नावाने मजा करा. असे सांगत शास्त्री यांनी ट्रोर्लसना सडेतोड उत्तर दिले आहे.

टीका ही कामगिरीवर अवलंबून असते

ते म्हणाले की, अशा गोष्टी पोस्ट केल्यावर किती लोक हसतात, यार, किती लोक खुश होतात. मजा करा यार जोपर्यंत संघ चांगली कामगिरी करतो तोपर्यंत मी आनंदी आहे. ते कामगिरीवर अवलंबून असते. जर तुम्ही चांगले केले तर तुमची प्रशंसा होईल, जर तुम्ही चांगली कामगिरी केली नाही तर तुम्हाला फटकारले जाईल. शांतता ठेवा ओम शांती ओम. असे म्हणत शास्त्री यांनी ट्रोलर्सबाबस मत व्यक्त केले. नामिबियाचा पराभव करत टीम इंडियाचं (India vs Namibia) टी-20 वर्ल्ड कपमधलं (T20 World Cup) आव्हान संपुष्टात आलं. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध दारूण पराभव झाल्यानंतर भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाला धूळ चारली, पण पहिल्या दोन पराभवांमुळे भारताचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न भंगलं. नामिबियाविरुद्धच्या सामना विराट कोहलीचा (Virat Kohli) कर्णधार म्हणून तर रवी शास्त्रींचा (Ravi Shastri) कोच म्हणून अखेरचा सामना ठरला. टी-20 वर्ल्ड कपनंतर आपण टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं विराटने आधीच जाहीर केलं होतं, तर रवी शास्त्रींचा कार्यकाळ टी-20 वर्ल्ड कपनंतर संपणार होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या