राजकोट, 04 मार्च : रणजी करंडक 2019-20 सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेचे दोन्ही उपांत्य फेरीतील सामने रोमांचक झाले. दुसऱ्या सामन्यात सौराष्ट्र संघाने अगदी अटीतटीच्या सामन्यात गुजरातला नमवत तिसऱ्यांदा रणजी करंडकच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात सौराष्ट्र संघाचा कर्णधार जयदेव उनाडकटने दुसऱ्या डावात 7 विकेट घेत संघाला 92 धावांनी विजय मिळवून दिला. गुजरातला विजयासाठी 327 धावांची गरज असताना दुसऱ्या डावात संपूर्ण संघ 234 धावांवर बाद झाला. आता अंतिम सामना बंगाल विरुद्ध सौराष्ट्र यांच्यात होणार आहे. सौराष्ट्र संघाने पहिल्या डावात 304 धावा केल्या, तर गुजरातच्या संघाने 252 धावांपर्यंत मजल मारली. यासह सौराष्ट्र संघाला 51 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात सौराष्ट्र संघाने 15 धावांतच 5 विकेट गमावल्या. त्यानंतर अर्पित वसावडाने 139 धावांची शानदार खेळी करत सौराष्ट्रची धावसंख्या 274 धावांवर गेली. त्यामुळं गुजरातला जिंकण्यासाठी 327 धावांची गरज होती.
वाचा- विराटच्या चुकीमुळे संपणार फलंदाजाचे करिअर, कोहलीवर भडकला माजी क्रिकेटपटू सामन्याच्या शेवटच्या दिवशी पहिल्या दोन सत्रात गुजरात संघाने शानदार फलंदाजी करत सामना रोमांचक बनविला. कर्णधार पार्थिव पटेलने 93 धावा केल्या तर चिराग गांधीने 96 धावांची खेळी केली. दुसर्या डावात दोन्ही फलंदाजांनी सौराष्ट्रच्या गोलंदाजांना त्रास दिला. चहा नंतर पार्थिव पटेल 221 धावांच्या धावसंख्येवर बाद झाला आणि त्यानंतर गुजरात संघाचा डाव गडगडला. वाचा- कोरोनाव्हायरसमुळे IPLवर टांगती तलवार! बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती जयदेव उनाडकट पाटला सामना पहिल्या दिवसाच्या पहिल्या दोन सत्रात पार्थिव आणि गांधी यांनी एकही विकेट दिली नाही. मात्र त्यानंतर उनाडकटने सामन्याचे रुप पालटले. उनाडकटने पार्थिवची विकेट घेतली, त्यानंतर पुढच्याच चेंडूवर अक्षर पटेलला माघारी धाडले. या दोन विकेटमुळे गुजरातच्या तोंडचा खास उनाडकटने पळवला. वाचा- IPL 2020 आधी BCCI ने घेतला मोठा निर्णय, विजेत्यांसह इतर संघांचे होणार नुकसान उनाडकटने दुसऱ्या डावात घेतल्या 7 विकेट पहिल्या डावात 3 विकेट घेतल्यानंतर दुसऱ्या डावात उनाडकटने 7 विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात 22.2 ओव्हरमध्ये सौराष्ट्रचा कर्णधार उनाडकटने 56 धावा देत 7 विकेट घेतल्या. यात 11 ओव्हर मेडन होत्या.