Photo-BCCI Domestic
बँगलोर, 8 जून : रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये (Ranji Trophy Quarter Final) आणखी एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली आहे. बंगालच्या टीमने (Bengal vs Jharkhand) असा विक्रम केला जो आतापर्यंत कोणालाच करता आला नव्हता. टीमच्या पहिल्यापासून नवव्या क्रमांकाच्या बॅट्समननी 50 किंवा त्यापेक्षा जास्त रन केले. यामध्ये दोन शतकांचाही समावेश आहे. बंगाल आणि झारखंड यांच्यात बँगलोरमध्ये सुरू असलेल्या क्वार्टर फायनलमध्ये हा इतिहास घडवला गेला. बंगालने 773 च्या स्कोअरवर डाव घोषित केला. टीमचे 7 खेळाडू आऊट झाले, म्हणजेच क्रीजवर 9 बॅट्समन आले, या सगळ्यांनी 50 पेक्षा जास्त रन केले. बंगालकडून सुदीप कुमार घरामीने सर्वाधिक 186 रनची खेळी केली तर ए. मजूमदारने 117 रन केले. या दोघांशिवाय उरलेल्या 7 खेळाडूंनीही अर्धशतक केलं. अर्धशतक करणाऱ्या खेळाडूंमध्ये पश्चिम बंगालच्या सरकारमध्ये क्रीडा मंत्री असलेल्या मनोज तिवारीचाही समावेश आहे. मनोज तिवारीने 73 रनची खेळी केली.
बंगालच्या टीमचा स्कोअर अभिषेक रमण- 61 रन अभिमन्यू इश्वरन- 65 रन सुदीप कुमार घरामी- 186 रन ए.मजूमदार- 117 रन मनोज तिवारी- 73 रन अभिषेक पोरेल- 68 रन शाहबाज अहमद- 78 रन सायन मंडल- 53 रन नाबाद आकाश दीप- 53 रन नाबाद बंगालची टीम मोठ्या स्कोअरकडे आगेकूच करत असतानाच आकाश दीपने वादळी खेळी केली. त्याने फक्त 18 बॉलमध्ये 8 सिक्सच्या मदतीने 53 रन केले. आकाश दीपने रणजी ट्रॉफीमध्ये 300 च्या स्ट्राईक रेटने रन केले आहेत.