IND vs AUS : अश्विनने तोडला कपिल देव यांचा रेकॉर्ड
मुंबई, 2 मार्च : भारताचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विन सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात दमदार कामगिरी करीत आहे. आज इंदोर येथील होळकर स्टेडियमवर होत असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अश्विनने 3 विकेट्स घेऊन माजी कर्णधार कपिल देव यांचा रेकॉर्ड मोडीत काढला. कपिल देव यांच्या नावावर याआधी 687 विकेट घेण्याचा रेकॉर्ड होता. परंतु अश्विनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या सामन्यात 689 विकेट घेऊन कपिल यांचा रेकॉर्ड मोडला. यासह रविचंद्रन अश्विन हा क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज बनला आहे. Jasprit Bumrah : दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराह कमावतो इतके कोटी; मुंबईत आहे आलिशान फ्लॅट आतापर्यंत भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या लिस्टमध्ये अनिल कुंबळे प्रथम स्थानावर असून त्यांनी 953 विकेट घेतल्या आहेत. तर हरभजन सिंह याने 707 विकेट घेतल्या असून तो दुसऱ्या स्थानावर आहे. रविचंद्रन अश्विनने तिसरे स्थान मिळवले असून चौथ्या स्थानी 687 विकेट्स घेतलेले कपिल देव आहेत. तर पाचव्या स्थानी 597 विकेट घेतलेला गोलंदाज जहीर खान आहे.