JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Pro Kabaddi : U Mumba समोर सर्वात महागड्या खेळाडूचं आव्हान, कुठे पाहणार सामना Live?

Pro Kabaddi : U Mumba समोर सर्वात महागड्या खेळाडूचं आव्हान, कुठे पाहणार सामना Live?

प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabaddi League 2021) आज (रविवार) तीन सामन्यांचा थरार अनुभवता येणार आहे. यामध्ये यू मुंबासमोर (U Mumba) खडतर आव्हान आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 जानेवारी : प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabaddi League 2021) आज (रविवार) तीन सामन्यांचा थरार अनुभवता येणार आहे. यामध्ये भक्कम बचावासाठी प्रसिद्ध असलेल्या यू मुंबा (U Mumba) समोर यूपी योद्धाचे (UP Yoddha) आव्हान आहे. यूपी योद्धाला पीएकेलच्या पहिल्या विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. हे विजेतपद पटकाण्याच्या उद्देशानं त्यांनी ‘डुबकी किंग’ प्रदीप नरवालला (Pardeep Narwal) करारबद्ध केले आहे. प्रदीप नरवाल हा पीएकेलच्या (PKL) इतिहासातील सर्वात यशस्वी रेडर आहे. पाटणा पायरेट्सच्या या सर्वात यशस्वी टीमकडून पाच सिझन खेळलेल्या नरवालला यंदा यूपी योद्धाने तब्बल 1 कोटी 65 लाखांना खरेदी केले आहे. प्रो कबड्डीच्या इतिहासातील ही सर्वात महागडी बोली ठरली आहे. नरवालसाठी हा सिझन साधारण ठरला आहे. त्याने 4 मॅचनंतर 28 रेड पॉईंट्स कमावले असून तो सर्वाधिक पॉईंट घेणाऱ्या रेडरच्या यादीत आठव्या नंबरवर आहे. नरवालच्या कामगिरीचा थेट परिणाम यूपी योद्धांवर झाला आहे. यूपीची टीम 4 मॅचनंतर फक्त 1 विजयासह 9 व्या क्रमांकावर आहे. यू मुंबाचा कॅप्टन फजल अत्राचली (Fazal Atrachali) हा कबड्डी विश्वातील प्रसिद्ध डिफेंडर आहे. फजलमुळे मुंबाचा बचाव हा भक्कम असून तो भेदण्यासाठी नरवाल काय प्रयत्न करतो हे पाहावे लागेल. Pro Kabaddi League : भारताच्या कबड्डीपटूंचा पगार पाकिस्तानच्या बाबर आझमपेक्षा जास्त! ऐकून बसणार नाही विश्वास PKL 8 मध्ये 1 जानेवारी रोजी किती सामने आहेत? पीकेएल-8 मध्ये 1 जानेवारी रोजी 3 सामने होणार आहेत. यामधील पहिला सामना यू मुंबा विरुद्ध यूपी योद्धा यांच्यात होईल. दुसरा सामना बेंगलुरू बुल्स विरुद्ध तेलुगु टायटन्स तर तिसरा सामना दबंग दिल्ली विरुद्ध तामिळ थलायवाजमध्ये होणार आहे. PKL 8 मधील आजचे सामने कधी सुरू होतील? आज तीन सामने आहेत. पहिला सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. दुसरा त्यानंतर बरोबर एक तासांनी सुरू होईल. तर तिसरा आणि शेवटचा सामना रात्री 9.30 वाजता खेळला जाणार आहे. PKL 8 मधील सामन्यांचे थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल? भारतामध्ये या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण ‘स्टार स्पोर्ट्स नेटवर्क’ वर पाहता येणार आहे. PKL 8 चे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल? डिस्नी+हॉटस्टार ऍप आणि वेबसाईट कबड्डी मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या