JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / PKL Season 8 Schedule: जाणून घ्या प्रो कबड्डी लीग 2021 कधी सुरू होणार, कुठे असणार सामने?

PKL Season 8 Schedule: जाणून घ्या प्रो कबड्डी लीग 2021 कधी सुरू होणार, कुठे असणार सामने?

Pro Kabbadi League 2021, प्रो कबड्डी लीग सीझन 8 ची(PKL Season 8 Schedule) तारीख जाहीर झाली आहे. 22 डिसेंबरपासून या लीगला सुरुवात होणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 06 डिसेंबर: प्रो कबड्डी लीग सीझन 8 ची (PKL Season 8 Schedule) तारीख जाहीर झाली आहे. 22 डिसेंबरपासून या लीगला सुरुवात होणार असून, पहिला सामना बेंगळुरूमध्ये होणार आहे. या लीगमध्ये 12 संघ सहभागी होतील ज्यामध्ये अनेक रोमांचक सामने अपेक्षित आहेत. मात्र, सामन्यादरम्यान प्रेक्षकांना मैदानात परवानगी दिली जाणार नाही. दोन वर्षांनंतर ही लीग आयोजित करण्यात आली आहे. 2020 मध्ये कोरोनामुळे प्रो कबड्डी लीगचे आयोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे देशभरातील कबड्डी चाहते आपल्या आवडत्या संघांच्या सामन्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. म्हणूनच पहिले चार दिवस तीन सामन्यांच्या दराने आयोजित केले जात आहेत, असे मार्शल स्पोर्ट्सने म्हटले आहे. कोरोनामुळे संपूर्ण सीझन शेरेटन ग्रँड बेंगळुरू येथील व्हाईटफिल्ड हॉटेल आणि कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. हॉटेल बायोबबल अंतर्गत आणले जात असल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले. हे वाचा- 4 वर्षानंतर टीम इंडियात परलेल्या ‘मुंबईकरा’ची कमाल, टीम इंडियाचा दणदणीत विजय 12 संघांचे खेळाडू, मालक, सहाय्यक कर्मचारी, सामना अधिकारी आणि PKL कर्मचारी हे सर्व एकाच ठिकाणी हॉटेलमध्ये राहतील. सामना संपेपर्यंत इतरांना आत किंवा बाहेर जाऊ दिले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.

दिनांकमॅचवेळस्थळ
22 डिसेंबर(पहिला सामना)बंगळुरु विरुद्ध मुंबईसायंकाळी, 7.30वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
22 डिसेंबर(दुसरा सामना)तेलगु टाइटन्स विरुद्ध तमिळ थलाइवाजरात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
22 डिसेंबर(तिसरा सामना)बंगाल वारियर्स  विरुद्ध यूपी योद्धारात्री, 9.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
23 डिसेंबर(पहिला सामना)गुजरात जायंटस विरुद्ध जयपुर पिंंक पॅंथर्ससायंकाळी, 7.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
23 डिसेंबर(दुसरा सामना)दबंग दिल्ली केसी विरुद्ध पुणेरी पलटनरात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
23 डिसेंबर(तिसरा सामना)हरियाणा स्टिलर्स विरुद्ध  पटनारात्री, 9.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
24 डिसेंबर (पहिला सामना)यू मुंबई विरुद्ध दबंग दिल्ली केसीसायंकाळी, 7.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
24 डिसेंबर(दुसरा सामना)तमिळनाडू विरुद्ध बंगळुरुरात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
24 डिसेंबर(तिसरा सामना)बंगाल वारियर्स  विरुद्ध गुजरात जायंटसरात्री, 9.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
25 डिसेंबर(पहिला सामना)पटना विरुद्ध  यूपी योद्धासायंकाळी, 7.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
25 डिसेंबर(दुसरा सामना)पुणेरी पलटन विरुद्ध तेलगु टाइटन्सरात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
25 डिसेंबर(तिसरा सामना)जयपुर पिंंक पॅंथर्स विरुद्ध हरियाणा स्टिलर्सरात्री, 9.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
26 डिसेंबर (पहिला सामना)गुजरात जायंटस विरुद्ध दबंग दिल्ली केसीसायंकाळी, 7.30वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
26 डिसेंबर (दुसरा सामना)बंगळुरु विरुद्ध बंगाल वारियर्सरात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
27 डिसेंबर (पहिला सामना)तमिळ थलाइवाज विरुद्ध यू मुंबईसायंकाळी, 7.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
27 डिसेंबर(दुसरा सामना)यूपी योद्धा विरुद्ध जयपुर पिंंक पॅंथर्सरात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
28 डिसेंबर (पहिला सामना)पुणेरी पलटन विरुद्ध पटनासायंकाळी, 7.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
28 डिसेंबर (दुसरा सामना)तेलगु टाइटन्स विरुद्ध हरियाणा स्टिलर्सरात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
29 डिसेंबर (पहिला सामना)दबंग दिल्ली केसी विरुद्ध बंगाल वारियर्ससायंकाळी, 7.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
29 डिसेंबर (दुसरा सामना)यूपी योद्धा विरुद्ध गुजरात जायंटसरात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
30डिसेंबर (पहिला सामना)जयपुर पिंंक पॅंथर्स विरुद्ध  यू मुंबईसायंकाळी, 7.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
30डिसेंबर (दुसरा सामना)हरियाणा स्टिलर्स  विरुद्ध बंगळुरुरात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
31 डिसेंबर (पहिला सामना)  तमिळ थलाइवाज विरुद्ध पुणेरी पलटनसायंकाळी, 7.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
31 डिसेंबर(दुसरा सामना) पटना विरुद्ध बंगाल वारियर्सरात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
1 जानेवारी (पहिला सामना) यू मुंबई विरुद्ध यूपी योद्धासायंकाळी, 7.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
1 जानेवारी(दुसरा सामना)बंगळुरु विरुद्ध तेलगु टाइटन्सरात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
1 जानेवारी(तिसरा सामना)दबंग दिल्ली केसी विरुद्ध तमिळ थलाइवाजरात्री, 9.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
2 जानेवारी (पहिला सामना)गुजरात जायंटस विरुद्ध हरियाणा स्टिलर्ससायंकाळी, 7.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
2 जानेवारी (दुसरा सामना)पुणेरी पलटन विरुद्ध बंगळुरुरात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
3 जानेवारी (पहिला सामना)बंगाल वारियर्स विरुद्ध जयपुर पिंंक पॅंथर्ससायंकाळी, 7.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
3 जानेवारी(दुसरा सामना)तेलगु टाइटन्स विरुद्ध पटनारात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
4 जानेवारी (पहिला सामना)हरियाणा स्टिलर्स विरुद्ध यू मुंबईसायंकाळी, 7.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
4 जानेवारी (दुसरा सामना)यूपी योद्धा विरुद्ध  तमिळ थलाइवाजरात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
5 जानेवारी (पहिला सामना)पुणेरी पलटन विरुद्ध गुजरात जायंटससायंकाळी, 7.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
5 जानेवारी(दुसरा सामना)दबंग दिल्ली केसी विरुद्ध तेलगु टाइटन्सरात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
6 जानेवारी (पहिला सामना)पटना विरुद्ध तमिळ थलाइवाजसायंकाळी, 7.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
6जानेवारी  (दुसरा सामना)बंगळुरु विरुद्ध जयपुर पिंंक पॅंथर्सरात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
7 जानेवारी  (पहिला सामना)बंगाल वारियर्स विरुद्ध हरियाणा स्टिलर्ससायंकाळी, 7.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
7 जानेवारी (दुसरा सामना)जयपुर पिंंक पॅंथर्स विरुद्ध पुणेरी पलटनरात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
8 जानेवारी (पहिला सामना)यूपी योद्धा विरुद्ध  दबंग दिल्ली केसीसायंकाळी, 7.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
8 जानेवारी (दुसरा सामना)गुजरात जायंटस  विरुद्ध  पटनारात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
9 जानेवारी  (पहिला सामना)पुणेरी पलटन विरुद्ध बंगाल वारियर्ससायंकाळी, 7.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
9 जानेवारी  (दुसरा सामना)बंगळुरु विरुद्ध  यूपी योद्धारात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
10जानेवारी (पहिला सामना)तमिळ थलाइवाज  विरुद्ध हरियाणा स्टिलर्ससायंकाळी, 7.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
10जानेवारी(दुसरा सामना)जयपुर पिंंक पॅंथर्स विरुद्ध दबंग दिल्ली केसीरात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
11 जानेवारी (पहिला सामना)पटना विरुद्ध यू मुंबईसायंकाळी, 7.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
11 जानेवारी(दुसरा सामना)तेलगु टाइटन्स विरुद्ध गुजरात जायंटसरात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
12 जानेवारी  (पहिला सामना)हरियाणा स्टिलर्स विरुद्ध  यूपी योद्धासायंकाळी, 7.30 वाश्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
12 जानेवारी(दुसरा सामना)दबंग दिल्ली केसी विरुद्ध बंगळुरुरात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
13 जानेवारी  (पहिला सामना)बंगाल वारियर्स विरुद्ध तमिळ थलाइवाजसायंकाळी, 7.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
13 जानेवारी(दुसरा सामना)यू मुंबई विरुद्ध पुणेरी पलटनरात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
14 जानेवारी (पहिला सामना)जयपुर पिंंक पॅंथर्स विरुद्ध पटनासायंकाळी, 7.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
14 जानेवारी(दुसरा सामना)गुजरात जायंटस  विरुद्ध  बंगळुरुरात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
15 जानेवारी (पहिला सामना)हरियाणा स्टिलर्स विरुद्ध दबंग दिल्ली केसीसायंकाळी, 7.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
15 जानेवारी(दुसरा सामना)यूपी योद्धा विरुद्ध  तेलगु टाइटन्सरात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
15 जानेवारी(तिसरा सामना)यू मुंबई विरुद्ध बंगाल वारियर्सरात्री, 9.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
16 जानेवारी (पहिला सामना)तमिळ थलाइवाज  विरुद्ध जयपुर पिंंक पॅंथर्ससायंकाळी, 7.30 वाश्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
16 जानेवारी(दुसरा सामना)पटना विरुद्ध  बंगळुरुरात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
17 जानेवारी (पहिला सामना)पुणेरी पलटन  विरुद्ध  यूपी योद्धासायंकाळी, 7.30 वाश्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
17 जानेवारी(दुसरा सामना)तेलगु टाइटन्स विरुद्ध बंगाल वारियर्सरात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
18 जानेवारी (पहिला सामना)गुजरात जायंटस  विरुद्ध  यू मुंबईसायंकाळी, 7.30 वाश्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
19 जानेवारी(पहिला सामना)हरियाणा स्टिलर्स विरुद्ध पुणेरी पलटनसायंकाळी, 7.30 वाश्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
19 जानेवारी(दुसरा सामना)जयपुर पिंंक पॅंथर्स विरुद्ध तेलगु टाइटन्सरात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
20 जानेवारीतमिळ थलाइवाज  विरुद्ध गुजरात जायंटससायंकाळी, 7.30 वाश्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
20 जानेवारीTBC vs TBCरात्री, 8.30 वा.श्री कांतीराव स्टेडियम, बेंगळुरू
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या