JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / दिलीप कुमार यांच्या निधनानंतर पाकिस्तानमध्येही हळहळ, इम्रान खान-शाहिद आफ्रिदी म्हणाले...

दिलीप कुमार यांच्या निधनानंतर पाकिस्तानमध्येही हळहळ, इम्रान खान-शाहिद आफ्रिदी म्हणाले...

दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्या निधनाने फक्त भारतातूनच नाही तर पाकिस्तानमधूनही दु:ख व्यक्त केलं जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) आणि माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) यांनी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 जुलै: बॉलीवूडचे महान अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचं बुधवारी सकाळी निधन झालं, ते 98 वर्षांचे होते. मागचे 8 दिवस ते मुंबईच्या खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती होते. दिलीप कुमार यांच्या निधनाने फक्त भारतातूनच नाही तर पाकिस्तानमधूनही दु:ख व्यक्त केलं जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) आणि माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) यांनी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘दिलीप कुमार यांच्या निधनामुळे दु:ख झालं आहे. SKMTH साठी निधी गोळा करायला ते पुढे आले हे मी कधीही विसरू शकत नाही. निधीचे सुरुवातीचे 10 टक्के पैसे जमा करणं सगळ्यात कठीण होतं. दिलीप कुमार पाकिस्तान आणि लंडनमध्ये कार्यक्रमासाठी आल्यामुळे बराच निधी गोळा झाला,’ असं इम्रान खान म्हणाले. माझ्या पिढीसाठी दिलीप कुमार सर्वोत्तम आणि अष्टपैलू अभिनेते होते, असं ट्वीटही इम्रान खान यांनी केलं.

जाहिरात

SKMTH म्हणजे शौकत खनूम मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटर हे पाकिस्तानच्या लाहोर आणि पेशावरमध्ये आहे. लाहोरमधलं SKMCH&RC शौकत खनूम मेमोरियल ट्रस्टचं पहिलं रुग्णालय आहे. इम्रान खान यांची आई शौकत खनूम यांचं 1985 साली कॅन्सरने निधन झालं. यानंतर इम्रान खान यांनी कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला. यासाठी निधी गोळा करायला दिलीप कुमार यांनी पुढाकार घेतला. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यानेही दिलीप कुमार यांच्या निधनामुळे शोक व्यक्त केला आहे. ‘आपण सगळे अल्लाहचे आहोत, त्यामुळे आपल्याला परत तिकडे जावं लागतं. खैबर पख्तुनख्वापासून मुंबईपर्यंत आणि संपूर्ण जगभरात युसूफ खान साहेबांच्या चाहत्यांचं हे खूप मोठं नुकसान आहे. ते आमच्या मनात राहतील. सायरा बानो यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत,’ असं शाहिद आफ्रिदी म्हणाला.  अफरीदी ने कहा कि वास्‍तव में हम अल्‍लाह के हैं और उनके लिए हम लौट आएंगे. खैबर पख्तूनख्वा से मुंबई तक और दुनियाभर में यूसुफ खान साहब के फैंस के लिए यह बड़ा नुकसान है. वह हमारे दिलों में रहेंगे. सायरा बानो साहिबा के लिए गहरी संवेदना है. दिलीप कुमार यांचा जन्म पाकिस्तानच्या पेशावरमध्ये किसा खवानी बाजार भागात 11 डिसेंबर 1922 साली झाला होता. दिलीप कुमार यांचं पेशावरमध्ये असलेलं वडिलोपार्जित घर तिथल्या पख्तुनख्वा सरकारने विकत घ्यायला मंजुरी दिली होती. दिलीप कुमार यांच्या या घराला संग्रहालय बनवण्याची तिथल्या सरकारची योजना आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या