रावळपिंडी, 17 सप्टेंबर : 18 वर्षांनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलेल्या न्यूझीलंडच्या टीमने (Pakistan vs New Zealand)अखेरच्या क्षणी दौऱ्यातून माघार घेतली. पाकिस्तान दौऱ्यात न्यूझीलंडची टीम 3 वनडे आणि 5 टी-20 मॅचची सीरिज खेळणार होती, पण रावळपिंडीमध्ये होणाऱ्या पहिल्या वनडेआधीच न्यूझीलंड टीमने सुरक्षेचं कारण देत (New Zealand abandoned Pakistan Tour) आम्ही खेळणार नसल्याचं सांगितलं. न्यूझीलंडने अचानक हा निर्णय घेतल्यामुळे पाकिस्तानी मीडिया आणि त्यांच्या सेलिब्रिटींचा मात्र चांगलाच तीळपापड झाला आहे. पाकिस्तानच्या एका क्रीडा पत्रकाराने तर न्यूझीलंडला क्राईस्टचर्चच्या गोळीबाराची आठवण करून दिली. ‘बांगलादेशचे खेळाडू क्राईस्टचर्च मशिदीमध्ये (Christchurch Mosque Attack) झालेल्या गोळीबारापासून काही क्षण दूर होते. तेव्हा तुमची गुप्तचर यंत्रणा कुठे होती. जग त्या गोष्टीला विसरून गेलं, जसं काही घडलंच नाही.
तालिबानशी हातमिळवणी करणाऱ्या पाकिस्तानची जगात नाचक्की, न्यूझीलंडनं दिला झटका
पाकिस्तानचा दौरा करायला आजही कुरबुरी केल्या जातात,’ असं पाकिस्तानी पत्रकार रोहा नदीम म्हणाले. 2019 साली बांगलादेशची टीम न्यूझीलंडच्या दौऱ्यावर होती, तेव्हा क्राईस्टचर्चच्या मशिदीमध्ये गोळीबार झाला होता आणि 49 जणांचा मृत्यू झाला होता. बांगलादेशची टीम मशिदीमध्ये नमाजासाठी जाणारच होती, पण त्याच्या काही वेळ आधी गोळीबार झाला.
दुसरीकडे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यानेही न्यूझीलंडवर टीका केली आहे. न्यूझीलंडने पाकिस्तान क्रिकेटची हत्या केली आहे, असं ट्वीट शोएब अख्तरने केलं आहे. न्यूझीलंडविरुद्धची ही सीरिज रद्द होऊ नये यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुरेपुर प्रयत्न केले, पण यात त्यांना यश आलं नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी (Pakistan PM Imran Khan) न्यूझीलंडच्या पंतप्रधानांसोबतही चर्चा केली, तरीही न्यूझीलंडने दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला.