JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / न्यूझीलंडच्या खेळाडूच्या भावी पत्नीचा मॅचपूर्वी मृत्यू, तरीही तो बॅटींगला उतरला आणि...

न्यूझीलंडच्या खेळाडूच्या भावी पत्नीचा मॅचपूर्वी मृत्यू, तरीही तो बॅटींगला उतरला आणि...

न्यूझीलंडच्या (New Zealand) खेळाडूवर मॅचपूर्वी दु:खाचा पहाड कोसळला होता. एका रेल्वे अपघातामध्ये त्याच्या होणाऱ्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतरही त्याने कर्तव्याला प्राधान्य देत बॅटींग केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जून : न्यूझीलंडचे खेळाडू आज (23 जून) एक महत्त्वाची मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final) टीम इंडियाचा पराभव करत ऐतिहासिक विजेतेपद जिंकण्याची त्यांना संधी आहे. त्या न्यूझीलंडच्या खेळाडूवर मॅचपूर्वी दु:खाचा पहाड कोसळला होता. एका रेल्वे अपघातामध्ये त्याच्या होणाऱ्या पत्नीचे निधन झाले होते. मॅच सुरु होण्यापूर्वी समजलेल्या त्या घटनेनं तो सुन्न झाला होता. तो खेळाडू मॅच खेळणार नाही, हे टीम मॅनेजमेंटनं जाहीर केलं. पण टीमची नववी विकेट पडल्यानंतर आपली वेदना लपवत तो खेळाडू बॅट घेऊन मैदानावर उतरला. त्यावेळी सर्व प्रेक्षक थक्क झाले. कर्तव्य बजावण्यासाठी मैदानानावर उतरलेल्या ‘त्या’ खेळाडूचे नाव होते बॉब ब्लेयर (Bob Blair)  आजच्याच दिवशी (23 जून) त्यांचा वाढदिवस आहे. 23 जून 1932 रोजी जन्म झालेल्या बॉब यांनी 19 टेस्टमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले. दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध ख्रिसमसच्या आदल्या दिवशी सुरु असलेल्या अपघातामध्ये त्यांच्या होणाऱ्या पत्नीचा रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यानंतरही ब्लेयर मैदानात उतरले आणि त्यांनी शेवटच्या विकेटसाठी बर्ट सटक्लिफ यांच्यासोबत 33 रनची भागिदारी केली. या खेळीच्या दरम्यान ब्लेयर यांनी एक सिक्स देखील लगावला. 8 वर्षांपूर्वी टीम इंडियाने रचला होता इतिहास, विराटला पुन्हा आहे ‘ती’ संधी उजव्या हाताने फास्ट बॉलिंग करणाऱ्या ब्लेयरनं 19 टेस्टमध्ये 43 विकेट्स घेतल्या. एका इनिंगमध्ये 85 रन देऊन 4 विकेट्स ही त्यांची सर्वोच्च कामगिरी होती. ब्लेयर यांनी 119 प्रथम श्रेणी सामने खेळले. यामध्ये त्यांनी 537 विकेट्स घेतल्या. ब्लेयर त्यांच्या एकूण क्रिकेट रेकॉर्डपेक्षा त्यांनी दाखवलेल्या असमान्य धैर्याबद्दल क्रिकेट विश्वात ओळखले जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या