इंदूर, 12 नोव्हेंबर : एकदिवसीय क्रिकेटवर सध्या भारतीय फलंदाजांचे राज्य आहे. आयसीसी रॅकिंगमध्ये सध्या विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. सध्या आयसीसीनं जारी केलेल्या यादीत या दोघांमधला गुणांचा फरक कमी झाला. एकदिवसी क्रिकेटमधल्या जगातल्या पहिल्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहलची खुर्ची आता धोक्यात आली आहे. कारण रोहित शर्मा लवकरच विराटला मागे टाकू शकता. सध्याच्या रॅकिंगनुसार विराट कोहली 895 गुणांसह पहिल्या तर रोहित 863 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या दोन फलंदाजांशिवाय कोणताही फलंदाज टॉप-10मध्ये नाही आहे. शिखर धवन 19व्या स्थानी आहे. दरम्यान याआधी विराटला कसोटी रॅकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथनं मागे टाकले होते. वाचा- रोहित-राहुलची झाली चांदी, तर कॅप्टन कोहलीला बसला शॉक फलंदाजांशिवाय जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) गोलंदाजीमध्ये पहिल्या क्रमांकावर आपले वर्चस्व कायम राखले आहे. बुमराह 797 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर, न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट 740 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळं बुमराहचे स्थान सध्या अढळ आहे.
वाचा- असा गोलंदाज होणे नाही! 72 तासांत भारतीय गोलंदाजानं घेतली दुसरी हॅट्रिक टॉप 10मध्ये पांड्या एकमेव ऑलराउंडर एकदिवसीय अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टॉप-10मध्ये असलेला एकमात्र खेळाडू आहे. पांड्या 246 गुणांसह 10व्या स्थानी आहे. तर, इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देणारा बेन स्टोक्स 319 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. टीम इंडियानं वेस्ट इंडिज विरोधात शेवटची एकदिवसीय मालिका खेळली होती. दुसरीकडे बुमराह आणि पांड्या हे दोन्ही खेळाडू जखमी असल्यामुळं संघाबाहेर आहेत. वाचा- स्मार्ट गोलंदाजानं अम्पायरला दिला चकवा! हा VIDEO एकदा पाहाच टी-20 रॅकिंगमध्ये चाहरनं घेतली मोठी उडी दरम्यान याआधी जाहीर करण्यात आलेल्या टी-20 रॅकिंगमध्ये दीपक चाहरनं 88 जागांनी मोठी झेप घेतली आहे. बांगलादेश विरोधात झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात चाहरनं ऐतिहासिक हॅट्रिक घेतली. याचबरोबर 6 विकेटही घेतल्या. त्यामुळं टी-20 रॅकिंगमध्ये चाहर सध्या 42व्या स्थानावर आहे.