Dwayne Bravo
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर: वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोने(Dwayne Bravo) नुकतंच नव्या एका गाण्याचा टीझर लाँच केला आहे. सध्या त्याच्या या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. 25 सेंकदाच्या या टीझरमध्ये ब्रावोसोबत वेस्ट इंडिजचे खेळाडू ठेका ( West Indies players dance in video of Dwayne Bravo’s new track “World Champions’’) धरताना दिसत आहेत. ब्रावोने वर्ल्ड चॅम्पियन या नव्या गाण्याचा टीझर इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे हे गाणे 2016 झालेल्या टी 20वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजच्या विजयासाठी समर्पित केलं आहे. ब्रावोने हे गाणे आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले असून .“मरून टीमच्या चाहत्यांसाठी वर्ल्ड चॅम्पियन गाणं तयार आहे. या गाण्याचा आनंद घ्या आणि टीमला सपोर्ट करा”, असे कॅप्शनमध्ये त्याने म्हटले आहे. तसेच, संपूर्ण गाणं लवकरच प्रदर्शित केलं जाईल, अशी माहितीदेखील त्याने यावेळी दिली आहे.
ब्रावोच्या मागच्या गाण्याप्रमाणेच या गाण्यातही उत्साह आणि कॅरेबियन तडका असल्याचं दिसत आहे. या गाण्यात ख्रिस गेल, किरोन पोलार्ड, आंद्रे फ्लेचर, फॅबियन एलेन आणि सुनील नरिन सारखे खेळाडू थिरकताना दिसत आहेत. गाण्याचा हा टीझर एकहजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 45 हजारांहून अधिक जणांनी लाइक्स केले आहे.
ब्रावोने हे गाणं भारतात 2016 झालेल्या टी 20वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजच्या विजयासाठी समर्पित केलं आहे. वेस्ट इंडिजने अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करत चषकावर नाव कोरलं होतं. टी 20 वर्ल्डकप 2021 स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला इंग्लंडविरूद्ध आहे.
कायरन पोलार्ड (कप्तान), निकोलस पूरन, ख्रिस गेल, अकिल हुसैन, ड्वेन ब्राव्हो, रोस्टन चेस, आंद्रे फ्लेचर, शिमरॉन हेटमायर, एविन लुईस, रवी रामपॉल, आंद्रे रसेल, लेंडल सिमन्स, अल्फोन्सो थॉमस, हेडन वॉल्श. राखीव : डॅरेन ब्राव्हो, शेल्डन कॉटरेल, जेसन होल्डर, गुडाकेश मोटी