मराठी भाषा दिनी मुंबई इंडियन्सने केली ही खास गोष्ट
मुंबई, 27 फेब्रुवारी : आज सर्वत्र मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. प्रत्येक जण आज आपल्या व्हाट्सअप स्टेटस, तसेच सोशल मीडियावरून एकमेकांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच इंडियन प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्स फ्रेंचाइज देखील मराठी भाषा दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करीत आहे. मराठी भाषा दिनानिमित्त मुंबई इंडियन्सच्या ट्विटर अकाउंटवर सोमवारी सकाळ पासूनच मराठी भाषेत ट्विट केले जात आहेत. आतापर्यंत त्यांनी मराठी भाषेत 5 ट्विट केले आहेत. हे पाहून मुंबई इंडिअन्सचे फॅन्स खूपच खुश झाले असून ते या ट्विटवर लाईक्सचा वर्षाव करीत आहेत.
मुंबई इंडियन्स आज तात्यांचे प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ मधील कॅप्शन मराठी भाषेत करीत असून त्यांनी “मराठी म्हणजे आपुलकी! मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!” असं म्हणत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. यापूर्वी देखील मराठी भाषा दिनानिमित्त मुंबई इंडियन्सने अनेक खास गोष्टी केल्या आहेत. गेल्या वर्षी ‘आपली वन फॅमिली’ म्हणत मुंबईने मराठीत खेळा़डूंची नावे असलेले एक पोस्टर शेअर केले होते. यात रोहितच्या जर्सीवरील ४५ हा आकडा आणि रोहित शर्माचे नाव देखील मराठीत लिहिले होते.