रांची 26 एप्रिल : भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) हा त्याच्या शांत स्वभावामुळे कायमच ओळखला जातो. कॅप्टन कूल म्हणून नाव मिळवलेल्या धोनीची पत्नी (Sakshi Dhoni) मात्र सततच्या लोडशेडिंगमुळे (Load Shading) चांगलीच भडकली आहे. एवढच नाही तर तिने झारखंडच्या सरकारवरही निशाणा साधला आहे. महाराष्ट्राप्रमाणेच सध्या देशाच्या बऱ्याच राज्यांमध्ये वीज टंचाईचं संकट ओढावलं आहे, झारखंडही याला अपवाद नाही. काय म्हणाली साक्षी? झारखंडमध्ये गेली कित्येक वर्ष वीज टंचाई का आहे? हे मला करदाती म्हणून जाणून घ्यायचं आहे. वीज बचत करून आम्ही जबाबदारी पार पाडत आहोत, असं ट्वीट साक्षीने केलं आहे.
याआधी 2019 सालीही साक्षीने झारखंडमधल्या लोडशेडिंगवर टीका केली होती. ‘प्रत्येक दिवशी रांचीमध्ये वीज जाते, दिवसाला 4-7 तास लाईट नसतात. मागच्या 5 तासांपासून वीज गेलेली आहे. आजची तारीख 19 सप्टेंबर 2019 आहे. हवामानही चांगलं आहे आणि कोणता सणही नाही. संबंधित अधिकारी या समस्येवर लवकरच तोडगा काढतील,’ असं ट्वीट तेव्हा साक्षीने केलं होतं.
एमएस धोनी हा सध्या महाराष्ट्रामध्ये आयपीएल (IPL 2022) खेळत आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात धोनीने शेवटच्या ओव्हरला 17 रन करून सीएसकेला (CSK) रोमांचक विजय मिळवून दिला, पण पंजाबविरुद्ध काल झालेल्या सामन्यात धोनीला तसा करिश्मा पुन्हा करता आला नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये सीएसकेची कामगिरी निराशाजनक झाली आहे. 8 पैकी फक्त 2 मॅचमध्येच त्यांचा विजय झाला आहे, त्यामुळे ते पॉईंट्स टेबलवर नवव्या क्रमांकावर आहेत. धोनीने यंदाची आयपीएल सुरू व्हायच्या आधी कॅप्टन्सी सोडली, त्यामुळे रवींद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे.