JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पांढरी दाढी, रंगीबेरंगी ड्रेस! धोनीचा लूक व्हायरल; भाऊही आहे सोबत

पांढरी दाढी, रंगीबेरंगी ड्रेस! धोनीचा लूक व्हायरल; भाऊही आहे सोबत

खरंतर यावेळी कोणत्या हेलिकॉप्टर शॉटने नाही, तर त्याच्या ‘अतरंगी’ कपड्यांनी चाहत्यांचं लक्ष वेधलंय. धोनीला रंगीबेरंगी कपड्यांमध्ये पाहून चाहते आता रणवीर सिंहच्या ड्रेसिंग स्टाईलशी त्याची तुलना करू लागले आहेत.

जाहिरात

धोनी हा क्रिकेटमधला हिरो तर आहेच पण लूकच्या बाबतीत तो बॉलिवूड कलाकारांनाही टक्कर देतोय.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शिखा श्रेया, प्रतिनिधी रांची, 17 जून : आयपीएल 2023 जिंकून चेन्नई सुपर किंग्सला पाचवी ट्रॉफी मिळवून दिल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा सध्या रांचीमध्ये असल्याचं समोर आलं आहे. खरंतर यावेळी कोणत्या हेलिकॉप्टर शॉटने नाही, तर त्याच्या ‘अतरंगी’ कपड्यांनी चाहत्यांचं लक्ष वेधलंय. धोनीला रंगीबेरंगी कपड्यांमध्ये पाहून चाहते आता रणवीर सिंहच्या ड्रेसिंग स्टाईलशी त्याची तुलना करू लागले आहेत. खरंतर एम. एस. धोनीला कायम साध्या कपड्यांमध्ये पाहिलं जातं. साधेपणा, शांतपणा हीच त्याची ओळख आहे. मात्र सध्या त्याच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये धोनीचा वेगळाच अंदाज पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे या फोटोत त्याचा मोठा भाऊ नरेंद्र सिंह धोनी हेदेखील दिसत आहेत. धोनीच्या आयुष्यावरील बायोपिकमध्ये त्याच्या बहिणीचं पात्र दाखवण्यात आलं, मात्र भावाबाबत काही बोललं गेलं नाही. सोशल मीडियावरही कधी दोघांचा एकत्र फोटो दिसला नाही, त्यामुळे दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता हा फोटो समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दोन्ही भावांना एकत्र पाहून काहींना आनंद झाला, तर काहींनी असा अंदाज लावला की, कदाचित आता दोन्ही भाऊ एकत्र राहू लागले आहेत.

आयपीएल संपल्यावर बऱ्याच दिवसांनी धोनीच्या चाहत्याने त्याला त्याच्या रांचीच्या फार्महाऊसवर गाठलं आणि त्याच्यासोबत एक फोटो काढला. या फोटोमध्ये धोनी एका रंगीबेरंगी नाईट सूटमध्ये दिसत आहे. त्याला अशा वेगळ्या अंदाजात पाहून नेटकरी आश्चर्यचकीत झाले. एकाने म्हटलंय, ‘धोनी हा क्रिकेटमधला हिरो तर आहेच पण लूकच्या बाबतीत तो बॉलिवूड कलाकारांनाही टक्कर देतोय. धोनी हा एक परिपूर्ण अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्यासाठी काहीही अशक्य नाही.’ त्याचबरोबर धोनीच्या पांढऱ्या दाढीवरही चाहते अगदी फिदा झाले आहेत. परंतु त्याला अशा लूकमध्ये पाहण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. तसंच या फोटोत पांढऱ्या टी-शर्ट आणि निळ्या रंगाच्या ट्राऊजरमध्ये नरेंद्र सिंह धोनी अगदी साध्या लूकमध्ये दिसत आहेत. शेतात राबणारी ज्योती होणार डॉक्टर, पहिल्याच प्रयत्नात NEET मध्ये मिळवलं मोठं यश दरम्यान, मागील महिन्यात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023च्या अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा पाच गडी राखून पराभव केला आणि पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं. एमएस धोनी 250 सामन्यांमध्ये खेळणारा स्पर्धेच्या इतिहासातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. आयपीएलनंतर तो सध्या त्याच्या मूळ गावी रांचीमध्ये सुट्टीचा आनंद घेतोय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या