JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / लग्नानंतर प्रथमच के एल राहुलने पत्नी अथिया सोबत महाकालेश्वर मंदिराला दिली भेट, पाहा Video

लग्नानंतर प्रथमच के एल राहुलने पत्नी अथिया सोबत महाकालेश्वर मंदिराला दिली भेट, पाहा Video

के एल राहुलने अभिनेत्री अथिया शेट्टी सोबत जानेवारी महिन्यात लग्न केले. तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी के एल राहुल आणि अथिया शेट्टी या दोघांनी रविवारी उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात जाऊन पूजा केली. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

जाहिरात

के एल राहुलने पत्नी अथिया शेट्टी सोबत महाकालेश्वर मंदिरात दिली भेट

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 फेब्रुवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धा खेळवली जात आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत २ सामने झाले असून या दोन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. आता 1 मार्च पासून इंदोर येथे या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याला सुरुवात होणार आहे. यापूर्वी भारतीय क्रिकेटमधील नवविवाहित दाम्पत्य असणाऱ्या के एल राहुल आणि अथिया शेट्टी या दोघांनी उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराला भेट दिली. के एल राहुलने अभिनेत्री अथिया शेट्टी हिला काही वर्ष डेट केल्यानंतर जानेवारी महिन्यात तिच्याशी लग्न केले. तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी के एल राहुल आणि अथिया शेट्टी या दोघांनी रविवारी उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात जाऊन पूजा केली.  ज्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

संबंधित बातम्या

पहाटे 4 वाजता दोघ महाकालेश्वर मंदिरात पोहोचले. यावेळी झालेल्या बाबा महाकाल भस्म आरतीमध्ये भारतीय सलामीवीर सामील झाला. यासोबतच या दोघांनी बाबा महाकालची पूजा करून आशिर्वाद घेतले. अथिया आणि के एल राहुल यांनी मंदिरात थोडा वेळ घालवला यावेळी मंदिरात भाविकांची फार गर्दी झाली होती. कोणी देव तर कोणी गुरु, भारतीय क्रिकेटर्स यांच्या पुढे होतात नतमस्तक काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड विरुद्ध टी २० मालिके दरम्यान इंदोरला आलेल्या भारतीय संघाने देखील महाकालेश्वर मंदिरात येऊन पूजा केली होती. यावेळी  सूर्यकुमार यादवने रिषभ पंतच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्याचे म्हंटले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या