JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Jyotiraditya Scindia Cricket : मंत्री सिंधियांची बॅटींग पडली भाजप कार्यकर्त्याला महागात, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Jyotiraditya Scindia Cricket : मंत्री सिंधियांची बॅटींग पडली भाजप कार्यकर्त्याला महागात, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल...

सिंधियाच्या बॅटने जोरदार मारलेला चेंडू भाजप कार्यकर्त्याच्या थेट डोक्यात जाऊन लागला. दरम्यान जखमी अवस्थेतील कार्यकर्त्याला तातडीने संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रिवा(मध्यप्रदेश), 16 फेब्रुवारी : मध्य प्रदेशातील रीवा येथे केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही. दरम्यान त्यांच्यासाठी असलेल्या कार्यकर्त्यांनी फिल्डींगसाठी तयारी दर्शवत मैदान जोरदार सजले. परंतु मंत्री सिंधिया शानदार फलंदाजी करत असताना अचानक एक घटना दुर्घटना घडली.

सिंधियाच्या बॅटने जोरदार मारलेला चेंडू भाजप कार्यकर्त्याच्या थेट डोक्यात जाऊन लागला. दरम्यान जखमी अवस्थेतील कार्यकर्त्याला तातडीने संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे ही वाचा :   इंग्लंडने पहिल्याच दिवशी डाव केला घोषित, बेन स्टोक्सचा ‘डाव’ न्यूझीलंडवर पडला भारी

संबंधित बातम्या

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान मागच्या काही दिवसांपासून रीवा भागात दौऱ्यावर असताना ही घटना घडली. मध्यप्रदेशमधील विंध्य येथे विमानतळाची पायाभरणी करताना दोन्ही नेते रीवा येथे उपस्थित होते. त्यानंतर नव्याने बांधलेल्या स्टेडियमचेही उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया क्रिकेट खेळत असताना ही घटना घडली.

रिवाच्या चोरहाटा येथील विमानतळाच्या पायाभरणीसाठी आलेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विमानतळ पायाभरणीच्या उद्घाटनानंतर इटौरा बायपास येथे नव्याने बांधलेल्या स्टेडियमचे उद्घाटन केले. दरम्यान, उद्घाटनानंतर ज्योतिरादित्य सिंधिया मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी खाली आले. सिंधिया थेट बॅट हातात घेत फलंदाजी करण्यास उतरले. ते खेळत  असताना जोरदार फटका मारला तो थेट एका भाजप नेत्याच्या डोक्याला लागला.  

जाहिरात

हे ही वाचा :  पृथ्वी शॉच्या कारवर हल्ला होण्याआधी काय घडलं? हॉटेलबाहेरचे व्हिडीओ आले समोर

दुखापतीनंतर भाजप नेत्याला उपचारासाठी संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान त्यांच्या डोक्याला अनेक टाके पडले. आता त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्याचवेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया स्वतः स्थानिक आमदार राजेंद्र शुक्ला यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी संजय गांधी हॉस्पिटलमध्ये जखमी भाजप नेत्याची भेट घेतली.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या