IPL मधून सुट्टी होताच Boom Boom बुमराह पत्नीसह मॅनचेस्टर दौऱ्यावर
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर: टीम इंडियाचा स्टार यॉर्कर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)पत्नी संजना गणेशनसोबत (Sanjana Ganesan) सुट्टीचा आनंद लुटत असल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यांच्या या फोटोमुळे क्रिकेट जगतात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. कारण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या टी-20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाचे (Team India) 6 खेळाडूंनी बायो-बबलमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये बुमराहचादेखील समावेश आहे. त्यामुळे, Bio Bubble मध्ये न जाता बुमराह बाहेर कसा गेला? असा सवाल उपस्थित होतं आहे. या स्टार जोडीने द थिएटर ऑफ ड्रीम्सचा दौरा केला, जे मॅनचेस्टर युनायटेडचे घरचे मैदान (Home Ground) आहे. मॅनचेस्टर युनायटेडने बुमराह आणि संजनाचे फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. त्यांनी “ओल्ड ट्रॅफर्ड, जसप्रीत तुला पाहून खूप चांगले वाटले.” असे म्हटले आहे. मात्र, चाहते संभ्रमात पडले आहेत. कारण, काही दिवसापूर्वी, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह बायो-बबलमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली होती. तसेच, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आला होता. त्याचदरम्यानचा हे फोटो असल्याची चर्चादेखील सोशल मीडीयावर रंगली आहे.
तसेच, या भेटीदरम्यान बुमराहला 93 क्रमांक असलेली जर्सी भेट दिली आहे. जो टीम इंडियासाठी बुमराहच्या जर्सीचा नंबर आहे. जसप्रीत बुमराहनेही त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत मॅनचेस्टर युनायटेडचे आभार मानले आहेत. तसेच, थिएटर ऑफ ड्रीम्समध्ये आजचा दिवस खूप छान गेला. असेदेखील म्हटले आहे. हे वाचा- T20 World Cup: भारताच्या मॅचपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, कोचनं सोडली टीमची साथ बुमराहने आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्स संघासाठी खेळताना 14 सामन्यांमध्ये सर्वाधिक 21 विकेट्स घेतल्या होत्या. अंतिम सामन्यापूर्वी या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये बुमराह तिसऱ्या स्थानी आहे. बुमराह आता आपली पत्नी संजना गणेशनसोबत मॅनचेस्टरमध्ये आहे. संजना स्पोर्ट्स निवेदिका आहे. ती आयपीएल 2021 चे कामकाज पाहणाऱ्या प्रसारण टीमचा भाग होती.
टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह मार्च महिन्यात विवाहबद्ध झालाय. आयपीएल दरम्यान झालेल्या भेटीत जसप्रीत व संजना चांगले मित्र झाले आणि हळुहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. जानेवारी 2020 मध्ये दोघांनीही ‘Naman’ या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती आणि त्यावेळी त्यांच्या अफेअरच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र, त्यांनी कोणत्याही सोशल मिडीयावर आपल्या या नात्याबद्दल वाच्यता केली नव्हती.