2019 चा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना भलताच ऐतिहासिक ठरला. पहिल्यांदा फलंदाजी करून MIने 8 बाद 149 धावा केल्या. नंतर चेन्नईच्या फलंदाजांनी आपल्या संघाचे 8 बाद 147 अशी स्थिती झाली. शेवटच्या चेंडूवर 2 धावा हव्या असताना मलिंगाने एक उत्कृष्ट यॉर्कर टाकून शार्दूल ठाकूरला बाद केले आणि मुंबईने हा सामना एका धावेने जिंकून 2019 चं विजेतेपद पटकावलं.
मुंबई, 18 फेब्रुवारी : आयपीएलच्या 14 हंगामासाठी लिलाव (IPL Auction 2021) सुरू झाला आहे. 292 खेळाडूंसाठी बोली लावली जाणार आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)संघात सुद्धा नवीन खेळाडूंचा समावेश केला आहे. मुंबई इंडियन्समध्ये एकूण 7 नवे खेळाडू येणार आहे. एकूण 15 कोटी 35 लाख रुपयांचा लिलाव लावणार आहे. चेन्नईमध्ये सुरू असलेल्या लिलाव सुरू आहे. पियुष चावला आता मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. 2.40 कोटींची बोली लागणार आहे. पियुष चावला हा दिल्लीकडून खेळत होता. अखेर दिल्लीच्या तंबूत मुंबईने त्याला आपल्या ताफ्यात सामील केले आहे. इंधन दरवाढीवर पंतप्रधान मोदींचा उपाय, भारताचं ओपेक देशांना उत्पादन वाढीचं आवाहन तसंच नॅथन कुल्टर नाईल (Nathan Coulter Nile)या परदेशी खेळाडूला पुन्हा एकदा संघात सामावून घेतले आहे. नॅथन कुल्टर नाईलला मुंबई इंडियन्सने आधी संघातून मुक्त केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा 5 कोटींची बोली लावून संघात सामील करून घेतले आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सने आपल्या संघात आता जसप्रित बुमराहच्या जोडीला आणखी एक जलद गोलंदाज सामील केला आहे. अॅडम मिल्न (Adam Milne) या खेळाडूवर 3.20 कोटींची बोली लावून संघात सामील केले आहे. अॅडमसाठी राजस्थान रॉयल, सनरायझर्स हैदराबादने बोली लावली होती. पण मुंबई इंडियन्सने 3.20 कोटींची बोली लावून त्याला आपल्या संघात आणले. क्विंटन डिकॉकची माघार तर लिलावासाठी काही मिनिटं शिल्लक असताना मुंबईच्या स्टार खेळाडूने मानसिक स्वास्थ बिघडल्यामुळे T-20 स्पर्धेतून ब्रेक घेतल्याचं समजत आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्ससमोर संघाच समतोल राखण्याच मोठ संकट उभं राहील आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डीकॉकने (Quinton de Kock ) यावेळी मानसिक स्वास्थ बिघडल्यामुळे एक ब्रेक घेतल्याचे ठरवलं आहे. डीकॉकला यावेळी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे आता किती दिवस T-20 स्पर्धेतून ब्रेक घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ब्रेक घेतल्यामुळे डीकॉक स्थानिक T-20 सामन्यात खेळणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे पण आयपीएल ( IPL) मध्ये खेळण्याबाबत अजुनही साशंकता आहे. यावेळी आयपीएल भारतात खेळवली जाण्याची शक्यता जास्त आहे आणि त्यामध्ये बायो-बबल देखील असणार आहे. या गोष्टीचा त्रास डीकॉकला पुन्हा होऊ शकतो अशी भीती डॉक्टरांना आहे त्यामुळे अजुनही आयपीएल मध्ये खेळण्याबाबत अजून कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही