JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL Auction 2020 : ‘विराट’वर लागली 1.90 कोटींची बोली, या संघाकडून खेळणार IPL

IPL Auction 2020 : ‘विराट’वर लागली 1.90 कोटींची बोली, या संघाकडून खेळणार IPL

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी आठही संघ सध्या खेळाडूंवर बोली लावत आहेत. यात परदेशी खेळाडूंवर आतापर्यंत सर्वात जास्त बोली लावण्यात आली आहे. तर, युवा खेळाडूही यात मागे नाही आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोलकाता, 19 डिसेंबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी आठही संघ सध्या खेळाडूंवर बोली लावत आहेत. यात परदेशी खेळाडूंवर आतापर्यंत सर्वात जास्त बोली लावण्यात आली आहे. तर, युवा खेळाडूही यात मागे नाही आहे. भारताचा अंडर-19 कर्णधार प्रियम गर्गला हैदराबाद संघानं 1.90 कोटींना विकत घेतले. तर, विजय हजारे करंडकमध्ये द्विशतकी खेळी करणाऱ्या यशस्वी जयस्वालवर राजस्थान संघानं 2.40 कोटींची बोली लावली. तर, प्रथम श्रेणी क्रिकेट गाजवणाऱ्या विराट सिंहवर हैदराबादनं 1.90 कोटींची बोली लावली. आयपीएलच्या लिलावात विराट सिंह या युवा खेळाडूचे नाव सर्वात आघाडीवर होते. 20 लाख बेस प्राईज असलेल्या विराटवर 1.90 कोटींची बोली लागली. विराटला संघात घेण्यासाठी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि हैदराबाद यांच्यात चुरस रंगली होती. मात्र अखेर हैदराबादनं विराट सिंहला आपल्या संघात घेतले. त्याचबरोबर भारताचा अंडर-19 कर्णधार प्रियम गर्गलाही हैदराबाद संघानं 1.90 कोटींना विकत घेतले.

संबंधित बातम्या

झारखंडचा फलंदाज विराट सिंह याचे नाव विराट असले तरी तो धोनीचा चाहता आहे. विराट भारतासाठी अंडर-19 वर्ल्ड कप खेळला आहे. तर, सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्यानं 10 सामन्यात 57.16च्या सरासरीनं 343 धावा केल्या आहेत. या स्पर्धेत त्यानं 3 अर्धशतकही लगावले होते. त्यामुळं आयपीएलमुळं भारतीय संघाला आणखी एक विराट कोहली मिळण्याची शक्यता आहे. प्रियम गर्ग उजव्या हाताचा फलंदाज प्रयिम गर्ग गेल्या काही दिवसात विशेष चर्चेत आले आले. कारण अंडर-19 वर्ल्ड कप संघाचे नेतृत्व प्रियमकडे देण्यात आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रियमच्या नावावर द्विशतक आणि लिस्ट एमध्ये शतकी खेळीची नोंद आहे. रणजी करंडक 2018-19मध्ये गर्ग उत्तर प्रदेशकडून खेळताना सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यानं 67.83च्या सरासरीनं 814 धावा केल्या होत्या. त्यामुळं आयपीएलमध्ये प्रियम उत्कृष्ठ कामगिरी करू शकतो. यशस्वी जयस्वाल 17 वर्षीय यशस्वी जयस्वालनं यंदा विजय हजारे ट्रॉफीमध्ये विक्रमी कामगिरी केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कमी वयात द्विशतकी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला. विजय हजारे स्पर्धेत त्यानं 3 शतक, एक अर्धशतक आणि द्विशतकी खेळी करण्याची कामगिरी 112.80च्या सरासरीनं केली. एवढेच नाही तर त्यांची भारताच्या अंडर-19 संघातही निवड झाली आहे. मुंबईकर यशस्वीला संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्सकडे जास्त शिल्लक रक्कम नसल्यामुळं राजस्थान संघाने त्याला 2.40 कोटींना विकत घेतले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या