JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL Auction 2020 : रोहित शर्माला मिळाला नवा पार्टनर! मुंबई इंडियन्सनं ‘या’ स्टार खेळाडूला घेतले संघात

IPL Auction 2020 : रोहित शर्माला मिळाला नवा पार्टनर! मुंबई इंडियन्सनं ‘या’ स्टार खेळाडूला घेतले संघात

IPL Auction 2020 : या लिलावात सर्वात आधी ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर ख्रिस लीनवर बोली लागली.

जाहिरात

चारवेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्स संघ यावेळी पाचव्यांदा चॅम्पियन होण्यास सज्ज आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्माला या पाच फलंदाजांकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोलकाता, 19 डिसेंबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी लिलावाला सुरुवात झाली आहे. यात 332 खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. दरम्यान या लिलावात सर्वात आधी ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर ख्रिस लीनवर बोली लागली. आयपीएलच्या लिलावात ख्रिस लीन सर्वात चर्चेत आलेला खेळाडू होता. कोलकाता संघानं रिलीज केल्यानंतर लीननं टी-10 लीगमध्ये धमाकेदार फलंदाजी केली होती. त्यामुळं आयपीएलमध्ये त्यावर किती बोली लागणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र मुंबई इंडियन्सनं 2 कोटी रुपयांना विकत घेतले. ख्रिस लीन गेल्या दोन हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळत होते. मात्र त्याला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर टी-10 लीगमध्ये दमदार कामगिरीमुळं लीन पुन्हा चर्चेत आला. लीनला मुंबई इंडियन्स संघात स्थान मिळाल्यामुळं रोहित शर्माला सलामीसाठी नवा पार्टनर मिळू शकतो. टी-10 लीगमध्ये लीननं 30 चेंडूत 91 धावा केल्या होत्या. त्यामुळं मुंबई इंडियन्ससाठी ही बोली फायद्याची असणार आहे.

संबंधित बातम्या

तर, 2018मध्ये आयपीएलमध्ये लीननं 491 धावा केल्या होत्या, यात तीन अर्धशतकांचा समावेश होता. त्याच्या 130 धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकातानं प्ले ऑफमध्ये प्रवेश केलाहोता. मात्र तरी कोलकातानं तेराव्या हंगामात त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्समध्ये सामिल झाल्यामुळं रोहित शर्माला याचा फायदा होणार आहे. सध्या लिलावात चार वेळा चॅम्पियन झालेल्या मुंबई संघाकडे 13.50 कोटी होते. तर मुंबईला 5 भारतीय तर 2 विदेशी खेळाडू खरेदी करायचे होते. त्यामुळं आता मुंबईला 5 भारतीय आणि 1 विदेशी खेळाडू खरेदी करायचा आहे, त्यासाठी आता त्यांच्याकडे 11.50 कोटी आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या