विराट आणि गांगुलीतील वाद चिघळला! किंग कोहलीने उचललं मोठं पाऊल
मुंबई, 17 एप्रिल : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि माजी क्रिकेटर सौरव गांगुली यांच्यातील वाद संपण्याचा नाव घेत नाही. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्या दरम्यान विराट कोहली आणि सौरव गांगुलीने एकमेकांना खुन्नस दिल्याच्या बातम्या येत असतानाच विराट कोहलीने गांगुली विरुद्ध मोठे पाऊल उचलले आहे. बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर 15 एप्रिल रोजी आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबी ने दिल्लीचा 23 धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर विराट कोहली आणि सौरव गांगुली या दोघांनी एकमेकांकडे दुर्लक्ष केले तसेच दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांसोबत हस्तांदोलन करत असताना विराट आणि गांगुलीने एकमेकांशी हात मिळवणे टाळले. दोघांमधील हा वाद इथपर्यंतच न थांबता khel.com ने दिलेल्या माहिती नुसार विराटने सौरव गांगुलीला इंस्टाग्रामवरून अनफॉलो केले आहे.
काय आहे विराट कोहली आणि सौरव गांगुली मधला वाद? काही वर्षांपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीने काही कारणास्तव भारताचे टी 20 कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांनी भारतीय संघ वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करण्यापूर्वी बीसीसीआयने विराट कोहलीला भारताच्या वनडे कर्णधारपदावरून देखील हटवले. यानंतरच विराट आणि गांगुली यांमध्ये वादाची ठिणगी पडली.बीसीसीआयने एकदिवसीय नेतृत्वातील बदलाबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही आणि त्याला फोन कॉलवर संघ रवाना होण्याच्या काही तासांपूर्वीच याबद्दल माहिती देण्यात आली असा आरोप केला. यावर तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पत्रकार परिषद घेऊन विराटच्या दाव्याचे खंडन केले. रवींद्र जडेजाच्या लग्नात झाला होता गोळीबार, पोलीस सुद्धा आले होते, पुढे काय घडलं? गांगुली यांनी म्हंटले की, विराट कोहलीने भारताच्या टी 20 कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याने बोर्डाने त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरून काढून टाकले आणि रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवले. यामागे भारताचे कर्णधारपद विभाजित होऊ नये असा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतु या स्पष्टीकरणानंतर देखील विराट आणि गांगुली यांच्यातील वाद काही थांबला नाही.