JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Virat Kohli SSC Marksheet : विराट कोहलीने शेअर केली दहावीची मार्कशीट! या विषयात होते सर्वात कमी मार्क

Virat Kohli SSC Marksheet : विराट कोहलीने शेअर केली दहावीची मार्कशीट! या विषयात होते सर्वात कमी मार्क

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीचे चाहते जगभरात आहेत. आयपीएल 2023 मध्ये देखील विराटने 2 शतक ठोकून आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. दरम्यान विराटने सोशल मीडियावर त्याची दहावीची मार्कशीट पोस्ट केली आहे.

जाहिरात

आयपीएलपूर्वी विराटने शेअर केली दहावीची मार्कशीट! या विषयात होते सर्वात कमी मार्क

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 जून : भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीचे चाहते जगभरात आहेत. त्याच्या मैदानावरील दमदार खेळीमुळे त्याला चाहत्यांनी किंग कोहली असे नाव दिले असून अनेकांसाठी तो त्यांचा आदर्श आहे. आयपीएल या जगप्रसिद्ध क्रिकेट लीगचा 16 वा सीजन नुकताच पारपडला. यात देखील विराट कोहलीने आपला जबरदस्त परफॉर्मन्स देऊन दोन शतक ठोकली. दरम्यान विराटने सोशल मीडियावर त्याची दहावीची मार्कशीट शेअर केली आहे. विराट कोहली ने ‘कू’ या अँपवरती त्याची दहावीची मार्कशीट शेअर केली आहे. मैदान गाजवणाऱ्या विराटला दहावी इयत्ते मिळालेले मार्क पासून त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. विराट कोहलीच्या समोर आलेल्या मार्कशीटनुसार दहावी इयत्तेत त्याला इंग्रजीमध्ये सर्वाधिक 83 गुण मिळाले होते. त्यानंतर सामाजिक शास्त्रात 81, हिंदीमध्ये 75, प्रास्ताविक आयटीमध्ये 74, विज्ञान आणि तंत्रज्ञानात 55 आणि गणितात 51 गुण मिळाले होते. ही मार्कशीट शेअर करताना विराटने याला मजेशीर कॅप्शन दिले आहे.

काही दिवसांपूर्वी 9 इयत्तेच्या इंग्रजी पेपरमध्ये विराट कोहलीवर निबंध लिहा असा प्रश्न आला होता. त्यानंतर आता विराटच्या 10 वीची मार्कशीट समोर आल्यामुळे याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या