स्मृती मानधना संदर्भात प्रश्न विचारताच विराटच्या तोंडून निघाली शिवी, Video Viral
मुंबई, 4 एप्रिल : सध्या देशभरात आयपीएल 2023 ची धामधूम सुरु असून क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात असून त्याने पहिल्याच सामन्यात मुंबई विरुद्ध 82 धावांची नाबाद खेळी केली. अशातच आरसीबीकडून विराट कोहलीची एक मुलाखत घेण्यात आली. यादरम्यान महिला क्रिकेटर स्मृती मानधनाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना विराट कोहलीच्या तोंडून शिवी निघाली. आरसीबी ने मुंबई विरुद्ध आयपीएल 2023 मधील पहिला सामना जिंकल्यावर संपूर्ण आरसीबीने टीमने जंगी सेलिब्रेशन केले. अशातच आयपीएल 2023 च्या निमित्ताने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून विराट कोहली ची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत मिस्टर नॅग्स यांनी विविध प्रश्न विचारून विराटला बोलते केले. यावेळी विराटने आरसीबी आणि आयपीएलशी संबंधित अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी मिस्टर नॅग्सने विचारलेल्या एका प्रश्नावर विराटच्या तोंडून अपशब्द निघाले.
झालं असं की, मुलाखतीत मिस्टर नॅग्सने विराटला स्मृती मानधनाबाबत एक प्रश्न केला. ज्यात तो म्हणाला, अलीकडेच स्मृती मानधना म्हणाली होती की विराटने जसे केले आहे तसे तिला आरसीबीसाठी काहीतरी साध्य करायचे आहे. यानंतर मिस्टर नॅग्स म्हणाला की स्मृती मानधना कदाचित योग्य मार्गावर आहे कारण ती महिला आयपीएलमध्ये आरसीबीसाठी केवळ दोन सामने जिंकू शकली आहे. या प्रश्नानंतर विराट कोहली खूप हसू लागला. हसता हसता त्याच्या तोंडून असे काही निघाले ज्यामुळे व्हिडिओमध्ये बीप वाजवावं लागलं. विराट कोहलीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.