JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : विराटची एकाकी झुंज, घरच्या मैदानात पुन्हा RCB चे लोटांगण

IPL 2023 : विराटची एकाकी झुंज, घरच्या मैदानात पुन्हा RCB चे लोटांगण

विराट कोहलीच्या अर्धशतकानंतरही केकेआरविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा 21 रनने पराभव झाला आहे.

जाहिरात

Photo- IPL

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बँगलोर, 26 एप्रिल : केकेआरविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा 21 रनने पराभव झाला आहे. केकेआरने दिलेल्या 201 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 179 रनच करता आले. विराट कोहलीने सर्वाधिक 54 रन केले, तर महिपाल लोमरोरने 34 आणि दिनेश कार्तिकने 22 रनची खेळी केली. केकेआरकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर सुयष शर्मा आणि आंद्रे रसेल यांना प्रत्येकी 2-2 विकेट घेण्यात यश आलं. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर केकेआरने 20 ओव्हरमध्ये 200/5 एवढा स्कोअर केला. जेसन रॉयने 29 बॉलमध्ये 56 रनची खेळी केली. कर्णधार नितीश राणाने 48 रन आणि व्यंकटेश अय्यरने 31 रनची खेळी केली. आरसीबीकडून विजयकुमार व्यशक आणि वानिंदू हसरंगाने 2-2 विकेट घेतल्या. पॉईंट्स टेबलमध्ये आरसीबी पाचव्या क्रमांकावर तर केकेआर सातव्या क्रमांकावर आहे. आरसीबीने 8 पैकी 4 मॅच जिंकल्या आहेत, तर 4 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. दुसरीकडे केकेआरने 8 पैकी 3 मॅच जिंकल्या आणि 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या