विराट अनुष्का पंजाबी गाण्यावर केला डान्स, पण शेवटी घडलेल्या प्रकाराने चाहते चिंतेत
मुंबई, 24 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये रविवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात आरसीबीचा विजय झाला. आरसीबीने 7 धावांनी हा सामना जिंकला असून या विजयानंतर विराट अनुष्काने त्यांचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघे क्रिकेट विश्वातील सर्वात प्रसिद्ध कपल असून दोघे एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करताना मागे पुढे पाहत नाहीत. रविवारी झालेल्या सामन्यात विराटने राजस्थान संघातील यशस्वी जयस्वालची कॅच घेऊन त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 100 कॅच घेण्याचा विक्रम केला. ही कॅच घेतल्यानंतर विराटने स्टॅण्डमध्ये उभी असलेल्या अनुष्काला फ्लायिंग किस दिली ज्यामुळे मैदानात पुन्हा एकदा त्यांचा रोमान्स चाहत्यांना पाहायला मिळाला.
विराट अनुष्काने त्यांच्या इंस्टाग्रामवर एक डान्सचा व्हिडिओ पोस्ट केला असून यात हे दोघे पंजाबी गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. दोघे जिममध्ये धम्माल डान्स करताना दिसत असून या दोघी ही स्टाईल त्यांच्या चाहत्यांना देखील आवडली आहे. परंतु व्हिडिओच्या शेवटी विराट डान्स करताना अचानक थांबतो आणि लंगडत चालायला लागतो. त्याला लंगडत चालताना पाहून वाटते की त्याचा पाय मुरगळला असावा किंवा कदाचित ही त्याची मजेदार शैली देखील असेल. परंतु याकृतीमुळे विराटच्या चाहत्यांना त्याच्याबद्दल चिंता वाटत असून यासंदर्भातील अनेक कमेंट्स विडिओच्या खाली पाहायला मिळत आहेत.